मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'माझी तुझी रेशीमगाठ'च्या टीमने 'सूर्यवंशी'च्या स्क्रीनिंगला केली फुलटू धमाल, पाहा VIDEO

'माझी तुझी रेशीमगाठ'च्या टीमने 'सूर्यवंशी'च्या स्क्रीनिंगला केली फुलटू धमाल, पाहा VIDEO

अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade )आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे  (prathna behere )यांनी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील टीमसाठी सूर्यवंशी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते.

अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade )आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prathna behere )यांनी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील टीमसाठी सूर्यवंशी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते.

अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade )आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prathna behere )यांनी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील टीमसाठी सूर्यवंशी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 9 नोव्हेंबर- अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade )आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे  (prathna behere )यांनी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील टीमसाठी सूर्यवंशी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते.श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेनने संपूर्ण टीमसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सूर्यवंशी चित्रपटाचे स्क्रीनिंग करायचे ठरविले. यावेळी आनंद काळे, शीतल क्षीरसागर, दिग्दर्शक अजय मयेकर, दीप्ती तळपदे यांच्यासोबत मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. या स्पेशल स्क्रीनिंगला कलाकारांनी खूप धमाल केली आहे. याचा व्हिडिओ श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रेयस तळपदेने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुझी रेशीमगाठ मालिकेतील सर्व टीम सिनेमागृहात धमाल मस्ती करताना दिसत आहे. गाण्यावेळी तर सर्वजण मस्त डान्स करताना दिसत आहे. या स्क्रीनिंग दरम्यानचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहमी पेक्षा वेगळ्या लुकमध्ये माझी तुझी रेशीमगाठ मधील कलाकार दिसत आहेत.

दररोजचं शुटिंग, धावपळ या सर्वातून वेळ काढत या टीमनं एकत्र येत दिवाळीनिमित्त हे खास स्क्रीनिंग ठेवलं होतं. सर्वांनी याचा मनोसक्त आनंद घेतल्याचाच या व्हिडिओत दिसत आहे.

वाचा : दिशा पाटनीची ही किक पाहून टायगर श्रॉफही झाला इम्प्रेस, पाहा VIDEO

‘सूर्यवंशी’ सिनेमाची कथा सूर्यवंशी या पोलीस अधिका-याची आहे. पत्नी आणि मुलापेक्षाही नोकरी प्रिय असलेल्या सूर्यवंशी मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये आई-वडिलांना गमावून बसतो. यानंतर या बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाइंड बिलाल (आणि ओमर हफीज या दोघांना शोधून काढणं, हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय बनतं. याचदरम्यान मुंबई बॉम्ब ब्लास्टसाठी प्रत्यक्षात 1000 किलो आरडीएक्स आलं होतं. त्यापैकी केवळ 400 किलो ब्लास्टसाठी वापरलं गेलं आणि उरलेलं 600 किलो आरडीएक्स अजूनही मुंबईत लपवून ठेवल्याची गुप्त माहिती त्याला मिळते. मुंबईत पुन्हा एका मोठ्या बॉम्बस्फोटाच्या कटाचे धागेदोरेही त्याच्या हाती लागतात. यानंतर सूर्यवंशी हा कट हाणून पाडण्यासाठी अक्षरश: जीवाचं रान करतो. सिंघम आणि सिम्बाची साथ त्याला मिळते. हे तिघं मुंबईला यांच्यापासून कसं वाचवतात, हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. प्रेक्षकांचा देखील या सिनेमाला चांगाल प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील गाण्याला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

वाचा: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचा झाला साखरपुडा

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेपैकी माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राचा सोशल मीडियावर खास चाहता वर्ग आहे. या मालिकेती परी हे पात्र तर सर्वांच्या लाडकं पात्र बनलं आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial