Home /News /entertainment /

वाढदिवसादिवशी श्रेयस तळपदेची चाहत्यांना भेट! मुक्ता बर्वेसोबत लवकरच जमणार जोडी

वाढदिवसादिवशी श्रेयस तळपदेची चाहत्यांना भेट! मुक्ता बर्वेसोबत लवकरच जमणार जोडी

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talapade) आज आपला 46 वा वाढदिवस (46th Birthday) साजरा करत आहे.

  मुंबई, 27 जानेवारी-   अभिनेता श्रेयस तळपदे  (Shreyas Talapade)  आज आपला 46 वा वाढदिवस   (46th Birthday)  साजरा करत आहे. वयाच्या चाळीशीनंतरही तो तितकाच फिट अँड हँडसम आहे. अभिनेत्याने आपल्या वाढदिवसा दिवशीच चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. श्रेयस लवकरच मुक्ता बर्वेसोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला आज प्रारंभ झाल्याचं त्यानं जाहीर केलं आहे. अभिनेता श्रेयस तळपदेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टीजर शेअर केला आहे. हा टीजर पाहून चाहते फारच उत्सुक झाले आहेत. हा टीजर श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचा आहे. आजच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अभिनेत्याने आपल्या वाढदिवसा दिवशी ही गोड बातमी शेअर करत सर्वांनांच आनंदी केलं आहे. श्रेयस तळपदेनं एक फारच सुंदर आणि तितकाच कलात्मक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कोणाचाही चेहरा दाखवण्यात आलेला नाही. यामध्ये फक्त हातांपासून बनलेली कलाकृती आणि भिंतीवर पडणारी त्याची सावली दाखवण्यात आली आहे. यामध्ये श्रेयस, मुक्ता आणि एका छोट्या मुलीचा आवाज ऐकू येतो. व्हिडीओमध्ये सुरु असलेल्या संभाषणावरून श्रेयस आणि मुक्ताला या चित्रपटात एक चिमुकली असल्याचं लक्षात येत आहे. या टीजरमध्ये ती श्रेयसला म्हणते तुमचा हात द्या. यावर श्रेयस विचारतो काय करत आहेस. यावर ती म्हणते बुमराह जसा बॉल पकडतो तसा हात करा. यावर श्रेयस उच्चारतो कसा धरतो बुमऱ्या बॉल, तेव्हा ती चिमुकली आपल्या आणि बाबांच्या हाताच्या सहाय्याने एक कलाकृती तयार करते. आणि दिव्याच्या प्रकाशात भिंतीवर त्याची सावली एखाद्या शेळीसारखी दिसते. आपल्यातील अनेकांनी हा प्रयोग करून पाहिला असणार हे नक्की. श्रेयसने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, 'आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपले प्रेम आणि आशिर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो…हीच बाप्पा चरणी प्रार्थना.
  त्यांनतर मुक्ता आणि श्रेयस आपल्या लेकीचं कौतुक करत हसताना ऐकायला येतं. आणि नंतर मुक्ता त्यांना थांबवत झोपा आता अशी हाक देते. हा टीजर पाहून चाहते फारच उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेसोबत संदीप पाठक, नंदू माधव, ख़ुशी हजारे, नवीन आभाळकर अशी अनेक कलाकार मंडळी आहे. आजपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. लवकरच श्रेयस आणि मुक्ता या सुंदर चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या