श्रेयण भट्टाचार्य आणि अंजली गायकवाड बनले 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'

श्रेयण भट्टाचार्य आणि अंजली गायकवाड बनले 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'

पश्चिम बंगालच्या श्रेयण भट्टचार्य आणि महाराष्ट्रातली मराठी मुलगी अंजली गायकवाड या दोघांनीही विजेतेपदाची ट्रॉफी घेतली.

  • Share this:

30 आॅक्टोबर : झी टीव्हीचा सगळ्यात प्रसिद्ध रियालिटी शो 'सारेगामापा लिटिल चॅम्प 2017'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. सगळ्याच चिमुकल्यांनी या फिनालेसाठी जोरदार परफॉर्मन्स दिले. हा सोहळा जयपूरमध्ये अगदी शानदाररीत्या पार पडला.या कार्यक्रमातले श्रेयण भट्टचार्य आणि अंजली गायकवाड हे दोघे या शोचे विजेते आहेत.

कार्यक्रमाला एक ट्विस्ट आणण्यासाठी निर्मात्यांनी एका नाही तर दोघांची नाव विजेता म्हणून घोषित केलं. पश्चिम बंगालच्या श्रेयण भट्टचार्य आणि महाराष्ट्रातली मराठी मुलगी अंजली गायकवाड  या दोघांनीही विजेतेपदाची ट्रॉफी घेतली.

श्रेयण हा 12 वर्षांचा आहे. तो पश्चिम बंगालच्या मिदानापूर या जिल्हातून आला आहे.फिनालेमध्ये त्याने त्याच्या मधुर आवाजात 'हवांये', 'सूरज डूबा', आणि 'जालिमा' ही रोमँटिक गाणी गायली. त्याचा गाण्याचा अंदाज आणि त्याच्या गाण्यातील निरागसपणामुळे त्याने सगळ्यांच्याच हृदयावर जादू केली.

11 वर्षांची अंजली ही नुकतीच या कार्यक्रमात चॅलेंजर म्हणून सहभागी झाली होती. तिचा विश्वास आणि तिच्या कौशल्यामुळे तिने फिनालेपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. लता मंगेशकरांची छबी असणाऱ्या अंजलीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. तिने फिनालेमध्ये 'दिवानी मस्तानी', 'झल्ला वल्ला', आणि 'में कोल्हापूर से आई हूं' ही गाणी गायली आहे.

सारेगामापा लिटिल चॅम्प हा शो नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अली यांच्या व्यतिरिक्त 30 सदस्यांनी जज केला. आदित्य नारायणने शोचं सूत्रसंचालन केलं.

First published: October 30, 2017, 5:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading