मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

गोड गायिकेच्या घरी ऐकू येणार ट्यांह ट्यांह! बेबी बंप दाखवत चाहत्यांना दिली GOOD NEWS

गोड गायिकेच्या घरी ऐकू येणार ट्यांह ट्यांह! बेबी बंप दाखवत चाहत्यांना दिली GOOD NEWS

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) आणि शिलादित्य मुखोपाध्याय (Shiladitya Mukhopadhyaya) लग्नाच्या 6 वर्षानंतर पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) आणि शिलादित्य मुखोपाध्याय (Shiladitya Mukhopadhyaya) लग्नाच्या 6 वर्षानंतर पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) आणि शिलादित्य मुखोपाध्याय (Shiladitya Mukhopadhyaya) लग्नाच्या 6 वर्षानंतर पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.

मुंबई, 04 मार्च : आपल्या मधूर आवाजानं देशातील लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका (Singer) श्रेया घोषालच्या (Shreya Ghoshal) घरी लवकरच एका छोटा पाहुणा येणार आहे. आपल्या व्यावसायिक आयुष्यातील घडामोडी सोशल मीडियावर शेअर करणारी श्रेया घोषाल खासगी आयुष्याबाबत फार गाजावाजा करत नाही. पण ही आनंदाची बातमी मात्र तिनं आपल्या फोटोसह सोशल मीडियावर शेअर केली आहे. श्रेया घोषाल आणि शिलादित्य मुखोपाध्याय पहिल्यांदा आई-बाबा होणार आहेत. श्रेया घोषालनं इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ‘बेबी श्रेयादित्य आपल्या वाटेवर आहे. शिलादित्य मुखोपाध्याय आणि मी तुम्हाला ही बातमी देताना अतिशय आनंदी आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. एका नव्या आयुष्याचं स्वागत करायला आम्ही उत्सुक आहोत.’ असा संदेश तिनं या फोटोसोबत लिहिला आहे.
श्रेयाच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांसह लाखो चाहत्यांनी अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. हे वाचा - शाहरुखची भविष्यवाणी ठरली खोटी; लोकप्रिय अभिनेत्रीनं 25व्या वर्षीच घेतली निवृत्ती श्रेयानं 2015 मध्ये शिलादित्य मुखोपाध्याय याच्यासोबत बंगाली पद्धतीनं लग्न केलं होतं. त्याआधी दहा वर्षे ते नात्यात होते. लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी 5 फेब्रुवारी 2018 रोजी श्रेयानं आपल्या प्रेमप्रकरणाचा खुलासा केला होता. श्रेयानं 2002 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या देवदास (Devdas) या चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून आपल्या कारकीर्द सुरू केली होती. या चित्रपटातील बैरी पिया, सिलसिला ये चाहत का, छलक-छलक, मोरे पिया, डोला रे डोला ही गाणी खूप गाजली. आतापर्यत 200 पेक्षा अधिक चित्रपटांतून तिनं गाणी गायली आहेत. हे वाचा -  मराठीतही आता लोकप्रिय मालिकांचे नवे सीझन येणार; या आवडत्या मालिका करत आहेत पुनरागमन बेबी बंपसह वेगवेगळ्या वेशात फोटो सेशन करून घेण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे. सेलिब्रिटींसोबत सामान्य महिलाही असे फोटो सेशन्स करून त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही गरोदरपणात फोटो शूट करून बेबी बम्पचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते ते प्रचंड लोकप्रियही झाले होते.
First published:

Tags: Bollywood, Pregnant, Singer

पुढील बातम्या