रोजच्या धकाधकीच्या थकाथकीच्या आयुष्यातून विरंगुळा मिळतो तो टेलिव्हिजनमधून आणि टेलिव्हिजनवरचा प्रेक्षकांना हसवणारा सर्वांचा लाडका कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना हसवण्याचा उचलेला विडा हवा येऊ द्याच्या विनोदविरांनी तसाच कायम ठेवला आहे. दर आठवड्याला एक नवा शो, एक नवी कॉन्स्पेस्ट आणि नवी विनोद घेऊन हे विनोदवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. या आठवड्यातही प्रेक्षकांनी हसवण्यासाठी विनोदवीर नवी कॉमेडी घेऊन येत आहेत. श्रेया बुगडे ही हवा येऊ द्याची लेडी डॉन असल्याचं म्हटलं जातं. श्रेयाने कार्यक्रमाविषयी, कलाकारांविषयी एक पोस्ट लिहित येता एपिसोड शेअर केला आहे. श्रेयानं पोस्टमध्ये म्हटलंय, 'वेड वेड वेड... मला नेहमीच असे वाटते की, चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावर इतकी वर्ष दिग्दर्शक, अभिनेते, लेखक आणि टीमबरोबर काम करताना मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते'. तर श्रेयाने आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात ती मी कात टाकली या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तर दुसरीकडे कुशल बद्रिकेही त्याच्या हटके स्टाईलने गाण्याचीची पुढची ओळ पूर्ण करतो. कुशलच्या या डान्स स्टेप्सनं मंचावर एकच हशा पिकतो.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial