• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • कास्टिंग काऊचच्या विरोधात अभिनेत्री श्री रेड्डीने केलं अर्धनग्न आंदोलन

कास्टिंग काऊचच्या विरोधात अभिनेत्री श्री रेड्डीने केलं अर्धनग्न आंदोलन

भर रस्त्यात अर्धनग्न होत तीने तेलगू इंडस्ट्रीत सुरू असलेल्या कास्टींग काऊचविरोधात आपला आवाज बुलंद केला.

  • Share this:
09 एप्रिल : तेलगू अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काऊचच्या विरोधात अतिशय आगळं वेगळं आंदोलन केलं. भर रस्त्यात अर्धनग्न होत तीने तेलगू इंडस्ट्रीत सुरू असलेल्या कास्टींग काऊचविरोधात आपला आवाज बुलंद केला. श्रीच्या आंदोलनाने चक्राऊन गेलेल्या पोलिसांनी तीला लगेचच ताब्यात घेतलं. कास्टींग काऊचला विरोध केल्यानंतर मुव्ही आर्टीस्ट असोसिएशनने त्यांची मेंबरशीप रद्द केली. त्याचा निषेध करण्यासाठीच तीने अर्धनग्न होत आपला निषेध नोंदवला. श्री रेड्डीने आरोप करताना म्हटले की, 'मी इंडस्ट्रीत बऱ्याचशा निर्मात्यांना माझे नग्न फोटोज् आणि व्हिडीओ पाठविले. मी हे सर्व त्यांच्या डिमांडनुसार केले. मात्र अशातही दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. तसेच एकाही चित्रपटात मला काम दिले नाही.' श्रीने सांगितले की, 'इंडस्ट्रीत ७५ टक्के भूमिकांसाठी अभिनेत्रींना काही ना काही मोबदला द्यावाच लागतो.' श्रीने 'Mee Too' या अभियानांतर्गत कोणाचे नाव न घेता सांगितले की, चित्रपटात रोल एक्सचेंज करण्यासाठी एका महिलेने तिला सेक्शुअल फेवरची मागणी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 'अय्यारी'ची अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने कास्टिंग काउचबद्दल आपले मत व्यक्त केले होते. दरम्यान, श्री रेड्डीने आरोप करताना म्हटले की, कास्टिंग काउचच्या मुद्द्यावर सर्वच चुप्पी साधून आहेत. यामुळेच तिने हैदराबादमधील 'जुबली हिल्स' या पॉश परिसरात शोषणाच्या विरोधात फिल्म चॅँबर ऑफिसच्या बाहेर अर्धग्न आंदोलन केले. श्रीच्या या आंदोलनानंतर इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.  
First published: