Home /News /entertainment /

तीन बदाम तीन.. ! श्रद्धा कपूरचे व्हॉट्सॲप chats लीक; युझर्सचा उडाला भडका

तीन बदाम तीन.. ! श्रद्धा कपूरचे व्हॉट्सॲप chats लीक; युझर्सचा उडाला भडका

श्रद्धाचे लीक व्हॉट्सअप चॅट्स (Shraddha Kapoors whatsapp chats leaked) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  मुंबई 31 जुलै : आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला रस असतो. मग तो सेलिब्रिटी दिवसभर काय करतो, काय खातो इतकच काय तर कुठे जातो व कोणाला डेट करतो यातही फार रस असतो. असच काहीसं अभिनेत्री श्रद्धा कपूसोबत (Shraddha Kapoor) घडताना दिसत आहे. श्रद्धाचे लीक व्हॉट्सअप चॅट्स (Shraddha Kapoors whatsapp chats leaked) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रद्धा अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट होत असते. कधी जीम साठी तर कधी शॉपिंग आणि प्रोफेशनल मीटिंग्ससाठी. यावेळीही श्रद्धा एका मीटिंगसाठी बाहेर पडली होती. सुंदर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती दिसत आहे. यावेळी ती तिच्या मोबाईलवर चॅटींग करताना दिसली. तर मागे उभे असणाऱ्या काही फोटोग्राफर्संनी श्रद्धा कपूरचे काही फोटो क्लिक केले. व ती चॅट करत असलेल्या मोबाईमधील चॅट्सही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
  View this post on Instagram

  A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

  यावेळी श्रद्धा कोणा खास व्यक्तीशी चॅट करत असलेली दिसली. तिने त्या व्यक्तीचं नाव तिन लाल बदाम असलेल्या चिन्हांनी सेव्ह केलं होतं. तर ते एकमेकांशीही खस गप्पा मारत होते. श्रद्धाने लिहिलं होतं, ‘मी माझ्या आयुष्यात तुझ्यासारख्या व्यक्तिला नाही भेटले.’ पुढे तिला रिप्लाय आला, ‘मला आनंद आहे की तु असा विचार करतेस’, पुढे तिने म्टटलं, ‘तु खरचं माझं ऐकतोस, असं कोणीही नव्हतं.’ यावर पुन्हा एक लाल बदाम रिप्लाय म्हणून येतो.

  ...त्या बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला बजावले

  अशा प्रकारचं हे लीक झालेलं चॅट्स आहेत. पण हे चॅट्स पाहून नेटकरी मात्र फारच भडकले आहेत. अनेकांनी हे फोटो घेणाऱ्या फोटोग्राफर्संना अनप्रोफेशनल म्हटलं आहे, तर अनेकांनी याची निंदा केली आहे. तर काहींना हे फेक असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपासून श्रद्धा आणि प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ (Rohan Shreshtha) हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Shraddha kapoor

  पुढील बातम्या