News18 Lokmat

...म्हणून श्रद्धा कपूरनं करण जोहरला दिला नकार

करण जोहरचा 'काॅफी विथ करण' हा शो लोकप्रिय होतोय. बाॅलिवूडचे अनेक स्टार्स इथे येतात. मनमोकळं बोलतात. पण अभिनेत्री श्रद्धा कपूरनं करणला शोमध्ये यायचा नकार दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2018 07:53 AM IST

...म्हणून श्रद्धा कपूरनं करण जोहरला दिला नकार

मुंबई, 23 नोव्हेंबर : करण जोहरचा 'काॅफी विथ करण' हा शो लोकप्रिय होतोय. बाॅलिवूडचे अनेक स्टार्स इथे येतात. मनमोकळं बोलतात. पण अभिनेत्री श्रद्धा कपूरनं करणला शोमध्ये यायचा नकार दिलाय.


या शोचं वैशिष्ट्यच असं की इथे खाजगी प्रश्न विचारले जातात. जसं की मलायका अरोराला तिच्या बर्थडेबद्दल विचारलं. तिचं उत्तर करणनं व्हायरल केलं. तसाच प्रश्न श्रद्धाला विचारला, तर फरहान अख्तरबद्दलही बोलणं भाग होईल. म्हणूनच तिनं ते टाळलं.


फरहान आणि श्रद्धा काही महिने एकत्र राहात होते. शक्ती कपूरला मात्र हे नातं पसंत नव्हतं. शेवटी ते तुटलंच. फरहान आता शिबानी दांडेकरसोबत आहे.

Loading...


करणच्या शोमध्ये कतरिना आली होती. त्यात तिला प्रश्न विचारला की, तू प्रेमाकडे कसं पाहतेस? 'प्रेमात तुम्ही नेहमी पाहता की तुमचा जोडीदार तुमच्याकडे किती लक्ष देतोय, किती प्रेम करतोय. ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या संबंधांवर, रिलेशनशिपवर परिणाम होऊ शकतो.' कतरिना म्हणते.


पुढे ती म्हणाली, ' स्त्रीच्या आयुष्यात पुरुष हवाच. पण तुम्ही तुमचा आनंद तुमच्या जोडीदारामध्ये शोधता. याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो.' कतरिना आणि रणबीर कपूरचं नातं तुटलं. काही महिने दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या बोलण्यात तिचं दु:ख चांगलंच जाणवलंय.


अजय देवगण काॅफी विथ करण शोमध्ये येणारेय. दिवाळीनंतर या शोचं शूटिंग होईल. महत्त्वाचं म्हणजे या शोमध्ये एकटा अजय येणार नाही. तर त्याच्या बरोबर काजोलही येणार आहे.


करण जोहर बाॅलिवूडमध्ये सगळ्यांचाच मित्र आहे. त्याची मैत्री सगळ्यांशीच चांगली असते. त्याचं शत्रुत्वही फार टिकत नाही. अजय देवगणच्या बहुचर्चित तानाजी सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 07:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...