श्रद्धा कपूरचा हा फोटो पाहून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटणार

श्रद्धा कपूरचा हा फोटो पाहून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटणार

श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केलाय. तो बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. हा फोटो तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या साहो सिनेमाचं शूटिंग करतेय.त्यासाठी ती हैदराबादच्या रामोजी राव सिटीत आहे. मध्यंतरी ती मुंबईला परतही आली होती. पण आता पुन्हा ती हैदराबादला परतली.

श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केलाय. तो बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. हा फोटो तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधला आहे.

या फोटोत तिच्या समोर जेवणाचे डबे उघडले आहेत. ते आहेत 23 डबे. त्यात खूपच छान पदार्थ दिसतायत. ते पाहून खुद्द श्रद्धाच्या तोंडालाही पाणी सुटलंय.श्रद्धा दाक्षिणात्य सिनेमा 'साहो' करतेय. तिच्या सोबत बाहुबलीफेम प्रभास आहे. दाक्षिणात्य सिनेमात श्रद्धा पहिल्यांदा काम करतेय. हा सिनेमा तेलगू, तामिळ आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

मध्यंतरी अभिनेत्री श्रद्धा कपूरला काॅफी विथ करण शोमध्ये बोलावलं होतं. पण तिनं करणला शोमध्ये यायचा नकार दिलाय. या शोचं वैशिष्ट्यच असं की इथे खाजगी प्रश्न विचारले जातात. जसं की मलायका अरोराला तिच्या बर्थडेबद्दल विचारलं. तिचं उत्तर करणनं व्हायरल केलं. तसाच प्रश्न श्रद्धाला विचारला, तर फरहान अख्तरबद्दलही बोलणं भाग होईल. म्हणूनच तिनं ते टाळलं.

फरहान आणि श्रद्धा काही महिने एकत्र राहात होते. शक्ती कपूरला मात्र हे नातं पसंत नव्हतं. शेवटी ते तुटलंच. फरहान आता शिबानी दांडेकरसोबत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 03:39 PM IST

ताज्या बातम्या