श्रद्धा कपूरचा धक्कादायक निर्णय, अचानक सोडला सायना नेहवालचा बायोपिक

सायनाची व्यक्तिरेखा हुबेहूब साकारता यावी यासाठी श्रद्धानं बॅडमिंटनचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 04:28 PM IST

श्रद्धा कपूरचा धक्कादायक निर्णय, अचानक सोडला सायना नेहवालचा बायोपिक

बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाची व्यक्तीरेखा साकारणार होती.

बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाची व्यक्तीरेखा साकारणार होती.

या बायोपिकच्या तयारीसाठी सायना आणि श्रद्धा एकमेकींना भेटल्यासुद्धा होत्या. एवढंच नाही तर सायनाची भूमिका हुबेहूब साकारता यावी यासाठी श्रद्धानं बॅडमिंटनचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती.

या बायोपिकच्या तयारीसाठी सायना आणि श्रद्धा एकमेकींना भेटल्या सुद्धा होत्या. एवढंच नाही तर सायनाची भूमिका हुबेहूब साकारता यावी यासाठी श्रद्धानं बॅडमिंटनचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती.

आता मात्र श्रद्धानं हा बायोपिक अचानक सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या भूमिकेसाठी कोणाची निवड होणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

आता मात्र श्रद्धानं हा बायोपिक अचानक सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या भूमिकेसाठी कोणाची निवड होणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

Loading...

'साहो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यानं सायनाच्या बायोपिकसाठी वेळ देता येणार नसल्याचं कारण देत अचानक श्रद्धानं या चित्रपटातून काढता पाय घेतला. श्रद्धाच्या या तडकाफडकी निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा खूप मेहनतही घेत होती. तसंच तिचं लूक टेस्टींगही झालं होतं. श्रद्धानं हा चित्रपट सोडल्यावर आता तिची जागा परिणीती चोप्रा घेईल असं म्हटलं जात आहे.

सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा खूप मेहनतही घेत होती. तसंच तिचं लूक टेस्टींगही झालं होतं. श्रद्धानं हा चित्रपट सोडल्यावर आता तिची जागा परिणीती चोप्रा घेईल असं म्हटलं जात आहे.

श्रद्धाकडे सध्या दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सोबत 'साहो' वरुण धवनचा एबीसीडी सीरीजमधील 'स्ट्रीट डान्सर' आणि टायगर श्रॉफचा 'बागी 3' असे बिग बजेट चित्रपट आहेत. या व्यग्र वेळापत्रकामुळे सायनाच्या बायोपिकला वेळ देता येत नसल्याचं श्रद्धानं सांगितलं.

श्रद्धाकडे सध्या दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सोबत 'साहो' वरुण धवनचा एबीसीडी सीरीजमधील 'स्ट्रीट डान्सर' आणि टायगर श्रॉफचा 'बागी 3' असे बीग बजेट चित्रपट आहेत. या व्यस्त वेळापत्रकामुळे सायनाच्या बायोपिकला वेळ देता येत नसल्याचं श्रद्धानं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...