बॉलिवूडमधील सर्वात HOT गाण्यावर विद्यार्थ्यांसमोरच थिरकली अभिनेत्री, VIDEO व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वात HOT गाण्यावर विद्यार्थ्यांसमोरच थिरकली अभिनेत्री, VIDEO व्हायरल

काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील ‘गर्मी सॉन्ग’ रिलीज झालं होतं.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : वरून धवन आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘स्ट्रीट डान्सर’ (street dancer ) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडक देण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील ‘गर्मी सॉन्ग’ (garmi song) रिलीज झालं होतं. हे गाणं बॉलिवूडमधील आतापर्यंतचं सर्वात बोल्ड गाणं मानलं जात आहे.

बॉलिवूड आणि बोल्डनेस हे समीकरण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. 'गर्मी' सॉन्गमध्ये नोरा फतेही (nora fatehi) आणि वरुण धवन (varun dhawan) यांच्या किलर डान्स मूव्ह पाहायला मिळत आहेत. पण या गाण्याला नोरानं दिलेला बोल्डनेसचा तडका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नोरानं डान्स केलेल्या आतापर्यंतच्या गाण्यांमध्ये हे सर्वाधिक बोल्ड गाणं असल्याचं बोललं जात आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच सूचना देण्यात आली आहे. 'सावधान, जो आप देखने जा रहे हैं वो इतना हॉट है कि उसे नजरअंदाज करना मुश्किल है'. यानंतर नोराचा बोल्ड आणि सिजलिंग अवतार या गाण्यात दिसत आहे.

‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ मधील गर्मी सॉन्ग नेहा कक्कर आणि बादशाह यांनी गायलं आहे. रिलीज झाल्यानंतर काही वेळातच या गाण्याला लाखो व्ह्यूव्ह मिळाले आहेत. त्यामुळे हे गाणं सोशल मीडियावर धमाका करणार यात अजिबात शंका नाही. तसेच या सिनेमातही धमाकेदार डान्स पाहायला मिळाणार आहेत. याआधी या सिनेमातील ‘मुकाबला’ हे गाणंही रिलीज झालं होतं. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ मधील मुकाबला हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असलं तरी गर्मी या गाण्याने मात्र लोकांना अक्षरश: वेड लावलं आहे. याचाच अनुभव सिनेमातील अॅक्टर्सलाही आला. ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ चं प्रमोशन करण्यासाठी गेलेल्या सिनेमाच्या टीमकडे विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनंतर नोरा फतेह आणि श्रद्धा कपूर यांनी गर्मी या गाण्यावर थिरकण्यास सुरुवात केली. हा डान्सही आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा सिनेमा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. टी सीरिजची निर्मिती असलेला हा सिनेमा रेमो डिसूझानं दिग्दर्शित केला आहे. याआधीही त्यानं अशाप्रकाचे सिनेमे तयार केले आहेत ज्यात ABCD आणि ABCD-2 या सिनेमांचा समावेश आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 13, 2020, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading