मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुभाष घई आणि अमिताभ बच्चन यांनी कधीच केलेलं नाही एकत्र काम, योग जुळला पण...

सुभाष घई आणि अमिताभ बच्चन यांनी कधीच केलेलं नाही एकत्र काम, योग जुळला पण...

अमिताभ बच्चन यांनी सुभाष घई यांच्यासोबत एकही सिनेमा केलेला नाही.

अमिताभ बच्चन यांनी सुभाष घई यांच्यासोबत एकही सिनेमा केलेला नाही.

बॉलिवूडचा बादशाहा अमिताभ बच्चन यांनी सुभाष घई यांच्यासोबत एकही सिनेमा केलेला नाही. या दोघांनी एकत्र सिनेमा का केलेला नाही असा विचार कधी केला आहे का..? नेमकं यामागं कारण काय आहे..?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 मार्च- 80 च्या दशकात एक दिग्दर्शक असा होता की त्याच्यासोबत प्रत्येकाला काम करायचं होतं. एकामागोमाग एक हिट देत त्यांनी शोमॅनचं टायटल नावावर केलं होत. राज कुमार, दिलीप कुमार, अनिल कपूर, जैकी श्रॉफ, संजय दत्त यासारख्या कलाकारांनी सुभाष घई यांच्या सिनेमात काम केलं आहे. फक्त काम केलं नाही तर त्यांना सुभाष घई यांच्या सिनेमानं त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. मात्र बॉलिवूडचा बादशाहा अमिताभ बच्चन यांनी सुभाष घई यांच्यासोबत एकही सिनेमा केलेला नाही. या दोघांनी एकत्र सिनेमा का केलेला नाही असा विचार कधी केला आहे का..? नेमकं यामागं कारण काय आहे..?

सुभाष घई यांची सिनेमा बनवण्याची पद्धत ही काहीशी वेगळी आहे. त्यांचा सिनेमा हा हमखास हिट होतोच. हिट आणि सुभाष घई यांचा सिनेमा असं समीकरणचं होतं. मात्र असं असताना देखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासोबत एकही सिनेमा का केला नाही..असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. असं नाही सिनेमा करण्याचा विचार आला नाही. दोघांनी एकत्र सिनेमा करण्याचं ठरवलं होतं. घोषणाही झाली होती, पण घोडं कुठं आडलं.. याविषयीचं आपण जाणून घेणार आहे.

वाचा-मृत्यूआधी आलू पराठ्यांवरून झालं होतं भाडणं; रुचिस्मिताच्या आईचा धक्कादायक खुलासा

धूमधडक्यात झाली घोषणा

1987 मध्ये सुभाष घई यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी देवा नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. या सिनेमात मुख्य भूमिका अमिताभ बच्चन साकारणार होते. या सिनेमात अमिताभ डाकूची भूमिका साकारणार होते. सिनेमाच्या मुहूर्ताचा कार्यक्रम मोठा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमिताभ बच्चन डाकूसारखा वेश परिधान केला होता. शिवाय हातात मशाल देखील घेतली होती. अमिताभ यांनी काही डायलॉग देखील बोलून दाखवले होते. त्यांचा या सिनेमातील लूक काहीसा त्यांच्या ‘खुदा गवाह’ या सिनेमातील भूमिकेशी मिळता जुळता असा होता.

वाचा-वडील गेल्यानंतर 16दिवसांनी आईचाही मृत्यू;'आई कुठे...'च्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर

एक आठवडे झालं काम

मुक्ता आर्टखाली बनत असलेल्या या सिनेमाचं काम फक्त एक आठवडाच चाललं. यानंतर सुभाष घई यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी डायरेक्ट सांगुन टाकलं की, देवा सिनेमाचं शुटींग बंद केलं आहे. आता हा सिनेमा निघणार नाही त्याला कारण त्यांनी क्रिएटिव्ह डिफरेंसेसच दिलं. मात्र यामागं खरं कारण काहीसं वेगळचं होतं.झालं असं की सिनेमाच्या सेटवर अमिताभ स्क्रिप्ट वाचत होते. त्यांना स्क्रिप्टमधलं काही समजलं नाही म्हणून त्यांनी मॅनेजरला सुभाष घई यांच्याकडं पाठवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, स्क्रिप्टवर बोलण्यासाठी अमिताभ बच्चन त्यांना बोलवत आहेत.

या कारणामुळं सिनेमाचं चित्रीकरण थांबलं..

जेव्हा मॅनेजर अमिताभ यांची ही गोष्ट सांगितली ती सुभाष घईंना पटली नाही. त्यांनी उलटा अमिताभ बच्चन यांना सांगावा धाडला. त्यांना माझ्यासोबत काही बोलायचं असेल तर स्वता माझ्याजवळ या आणि बोला. मग काय ही गोष्ट जेव्ह अमिताभ यांना समजली तेव्हा त्यांना देखील खूप वाईट वाटलं. मग काय ते सेटवरून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सेटवर आलेच नाही. मग काय आठवड्यात सिनेमाचं कामकाज गुंडाळलं. या एका कारणासाठी दोघांनी एकत्र काम केलं नाही.

First published:
top videos

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood News, Entertainment