जेव्हा पंकजा मुंडे आणि पूनम महाजन म्हणतात, कुछ कुछ होता है!

जेव्हा पंकजा मुंडे आणि पूनम महाजन म्हणतात, कुछ कुछ होता है!

या दोघींनी देखील मकरंद अनासपुरेशी दिलखुलास संवाद साधला. काही उत्तरं एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली आहेत. पंकजा मुंडे आणि पूनम महाजन यांनी त्यांच्या वडिलांशी संबंधीत काही आठवणी सांगितल्या जे ऐकल्यावर सगळेच भावुक झाले.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन बहिणी म्हणजेच पूनम महाजन आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत बेधडक गप्पा पाहता येतील. या दोघींनी देखील मकरंद अनासपुरेशी दिलखुलास संवाद साधला. काही उत्तरं एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली आहेत. पंकजा मुंडे आणि पूनम महाजन  यांनी त्यांच्या वडिलांशी संबंधीत काही आठवणी सांगितल्या जे ऐकल्यावर सगळेच भावुक झाले.

कार्यक्रमामध्ये पूनम यांनी शबरीमलाबद्दल देखील आपली मतं मांडली. त्या म्हणाल्या,शबरीमला हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यात जनता आणि कोर्ट दोघांचीही मतं महत्त्वाची ठरतात. त्यामुळे सरकारला निर्णय घेणं कठीण जातं.  त्या पुढे म्हणाल्या, 'भारत सुंदर लोकशाही असलेला देश आहे. सगळ्यांच्या मतांचा विचार करावा लागतो.'

यावेळी  पंकजा मुंडेंनी वडिलांच्या आठवणी शेअर केल्या. त्या म्हणाल्या, 'वडील असते तर  मी खूप वेगळी असते.'

या शोमध्ये चक्रव्यूह राउंड मजेशीर असतो. यामध्ये पूनम महाजन आणि पंकजा मुंडेंना अनेक प्रश्न विचारले. दोघींनी कुछ कुछ होता है आणि शोले सिनेमांमधले संवाद अनोख्या स्टाइलनं म्हटले.

राजकारणात अजित पवार की धनंजय मुंडे, असा अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला. अगदी भाजप सोडून कुठला पक्ष आवडतो, असंही विचारलं. एकूणच हा शो रंगतदार झाला.

पंकजा मुंडे आणि पूनम महाजन यांचा राजकीय मुखवटा गळून पडला होता. त्यांनी दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.

अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा चर्चेत, 'हा' लुक सोशल मीडियावर झाला व्हायरल

First published: December 18, 2018, 11:47 AM IST

ताज्या बातम्या