‘सरसेनापती हंबीरराव’चं तिकीट दाखवा अन् अर्धा डझन आंबे फ्री घेऊन जा, कधी आणि कुठे?
‘सरसेनापती हंबीरराव’चं तिकीट दाखवा अन् अर्धा डझन आंबे फ्री घेऊन जा, कधी आणि कुठे?
‘सरसेनापती हंबीरराव’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी करत आहेत. आता एका इतिहास वेड्या प्रेक्षकाने या सिनेमासाठी एक खास ऑफर ठेवली आहे.
मुंबई, 29 मे- स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजे आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र अन पाठीवरची ढाल बनून राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा 'हंबीरराव' (hambirro) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी करत आहेत. आता एका इतिहास वेड्या प्रेक्षकाने या सिनेमासाठी एक खास ऑफर ठेवली आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहून झाल्यावर या चित्रपटाचं तिकीट दाखवा आणि अर्धा डझन आंबे मोफत मिळवा अशी ही ऑफर गीतांजली सोनसुरकर आणि तुषार सोनसुरकर यांनी ठेवली आहे. आपला इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी ही नवी कल्पना या दोघांना सुचली आणि त्यांनी लगेच अंमलात देखील आणली. 27 मे पासूनच त्यांनी ही ऑफर सुरु केली असून येत्या 31 मेपर्यंत तुम्ही या चित्रपटाच्या तिकीटावर अर्धा डझन आंबे मिळवू शकता. पण चित्रपट पाहून झाल्यानंतरच ही तिकीट तुम्ही या ऑफरसाठी दाखवू शकता.
कुठे मिळणार?
10/1 मॉर्डन इमारत, जेबी रोड, कॉटन ग्रीन, मुंबई येथे तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत तिकीट दाखवून अर्धा डझन आंबे घरी घेऊन जाऊ शकता. तसेच इन्स्टाग्रामवर देखील त्यांचं fresh__greeny नावाचं अधिकृत अकाऊंट आहे.यावर देखील याची माहिती दिली आहे.सोनसुरकर यांच्या या ऑफरला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.