Big Boss 12 : या वीकेण्डला कोण पडणार बाहेर?

Big Boss 12 : या वीकेण्डला कोण पडणार बाहेर?

सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका कक्कड आणि सृष्टी रोडे नाॅमिनेट झाल्यात.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : 'बिग बाॅस 12'चा पहिला वीकेण्ड येतोय. सगळ्यांना  प्रतिक्षा आहे वीकेण्ड वाॅरची. म्हणजे एका आठवड्यानं आता घरातलं कुणातरी बाहेर जाणार. खबर अशी आहे की, 4 जोड्या चक्क नाॅमिनेट झाल्यात. त्यात सेलिब्रिटीजही आहेत आणि घरातले सर्वसामान्यही आहेत. त्यात सिंगलही आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका कक्कड आणि सृष्टी रोडे नाॅमिनेट झाल्यात. शिवाय जोड्यांमध्ये शिवाशीष-सौरभ, सबा-सोमी, अनुप- जसलीन आणि  रोशमी-कृति नाॅमिनेट झाल्यात.

'द खबरी'च्या ट्विटनुसार दीपिका कक्कडला जास्त मतं पडलीत. ती जास्त वर आहे. दुसऱ्या नंबरवर रोशनी आणि कृती आहे. तर तिसऱ्या नंबरवर सृष्टी रोडे आहे. चौथ्या नंबरवर शिवाशीष-सौरभ आणि पाचव्या नंबरवर सबा-सोमीची जोडी आहे.

दीपिका तर आता सेफ आहे. पण 'वीकेण्ड का वाॅर' चांगलाच रंगणार असं दिसतंय. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात जसे अनेक टीव्ही अभिनेत्रींचा समावेश असतो. या पर्वात दीपिका कक्कडची वर्णी लागलीय. बिग बॉसच्या घरात जाण्या आधी दीपिका कलर्स चॅनेलवरच्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकत झळकली होती. बिग बॉसच्या आधी तिने झलक दिखला जा त्या ८ व्या पर्वात सहभाग घेतला होता. नुकतेच तिने आपला सह-कलाकार शोएब इब्राहिमशी लग्न केलं.

सृष्टी रोडेने देखील अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. बिग बॉसच्या घरात येण्याआधी ती स्टार प्लसच्या 'इश्कबाज' या मालिकेत झळकली होती.

PHOTOS : मॅटवरची कुस्ती जिंकण्यासाठी राणादाची नवी खेळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading