S M L

नरेंद्र मोदींवरच्या लघुपटाच्या ट्रेलरला मिळाले 29 लाख हिटस्, तुम्ही पाहिला का?

सुखदु:खाचे अनेक क्षण आयुष्यभराची पुंजी बनून राहतात. काही गोष्टी ऐकून तर अंगावर शहारे आणतात. अशाच आठवणी आहेत नारूच्या. 'चलो जीते है' या शाॅर्ट फिल्ममधून असेच प्रसंग समोर येतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2018 05:47 PM IST

नरेंद्र मोदींवरच्या लघुपटाच्या ट्रेलरला मिळाले 29 लाख हिटस्, तुम्ही पाहिला का?

मुंबई, 27 जुलै : प्रत्येकाचंच बालपण, आठवणी कायमस्वरूपी लक्षात राहणाऱ्या असतात. लहानपणीचे प्रसंग कायमच मनावर कोरले जातात. सुखदु:खाचे अनेक क्षण आयुष्यभराची पुंजी बनून राहतात. काही गोष्टी ऐकून तर अंगावर शहारे आणतात. अशाच आठवणी आहेत नारूच्या. 'चलो जीते है' या शाॅर्ट फिल्ममधून असेच प्रसंग समोर येतात. ही फिल्म संपली आणि आॅडिटोरियममध्ये टाळ्यांचा कडकडाट काही थांबेना.

चलो जीते है ही शाॅर्ट फिल्म बनलीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर. फिल्ममधला छोटा नारू स्वामी विवेकानंदांमुळे प्रभावित झालाय. नारू शाळेतले गुरुजी, आई-वडील सगळ्यांना एकच प्रश्न विचारतोय. तुम्ही कोणासाठी जगता?या लघुपटात नारू एका गरीब विद्यार्थ्याला पाहतो. त्याच्याच वर्गातला. त्याकडे फीचे पैसे नसतात की जेवायला धड नसतं. मग नारू मुलांना घेऊन एक नाटक करतो. त्यातून मिळालेल्या पैशातून तो त्या मुलासाठी कपडे घेतो. म्हणजे तो मुलगा शाळेत येऊ शकेल. हा लघुपट इथेच संपतो. पण संपताना बरेच प्रश्न मागे ठेवून जातो.

हेही वाचा

गुरुपौर्णिमेला 'या' कलाकारांनी पुजलं आपल्या 'या' गुरूंना!

Loading...

प्रियांका आणि निकचा साखरपुडा झाला, आता लग्न कधी?

'भारत'मध्ये प्रियांकाच्या जागी कतरिना?

ही शाॅर्ट फिल्म दिग्दर्शित केलीय मंगेश हडवळेनं. आणि नारूचं काम केलंय ध्रुवनं. त्याचं कौतुक तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनीही केलंय. सिनेमात बरेच विनोदी क्षण आहेत. ते पाहून हसू आवरत नाही. पण प्रत्येकामागे एक संदेश लपलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 04:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close