Home /News /entertainment /

...तर पुन्हा सुरू होऊ शकतं सिनेमांचं शूटिंग, CM उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

...तर पुन्हा सुरू होऊ शकतं सिनेमांचं शूटिंग, CM उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

कोरोना व्हायरमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून सिनेमा आणि मालिकांचं शूटिंग बंद आहे.

    मुंबई, 21 मे : कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोणताही सिनेमा किंवा मालिकेची शूटिंग झालेली नाही. पण आता मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही अटींसह सिनेमा आणि मालिकांचं शूटिंग पुन्हा एकदा सुरू होऊ शकतं असे संकेत दिले आहेत. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधती काही लोकांची या संबंधी CM उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी संकेत दिले की, जर सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं शक्य असेल तर सिनेमा आणि मालिकांचं शूटिंग पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. त्यांनी 20 मे ला झालेल्या या बैठकीत फिल्म इंडस्ट्रीशी संबंधीत निर्मात्यांना लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांच पालन करत थांबवण्यात आलेलं शूटिंग सुरू करण्यासाठी योजना बनवण्यास सांगितलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी थिएटर्स पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. शूटिंग सुरू करण्यासाठी ही अट असेल बंधनकारक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी सिनेमांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितलं, सरकार टेलिव्हिजन आणि सिनेमांचं शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन सारख्या कामांना सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करत मर्यादित मनुष्यबळासह पुन्हा एकदा सुरू करण्याच्या योजनेवर विचार करेल. काय होती मागणी प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुख मागण्यांमध्ये सिंगल स्क्रिन थिएटर सुरू करणे, गीतकारांना मदत करणे आणि सिनेमाच्या निर्मितीवर जीएसटी माफ करणे या मागण्यांचा समावेश होता. दरम्यान तमिळनाडू सरकारनं सिनेमांच्या शूटिंगला परवानगी दिली आहे. मात्र कंटेनमेंट झोनमध्ये कोणतंही शूटिंग होणार नाही. तसेच कोरोना संबंधी गृहमंत्रालयानं दिलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. हेही वाचा लॉकडाऊनमध्ये सलमानचा Video Viral, जॅकलीनसोबत बाइक राइड करताना दिसला भाईजान लग्नानंतरही रिलेशनशिपमध्ये होता नवाझुद्दीन, Me Too अंतर्गत लागले होते गंभीर आरोप
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या