Home /News /entertainment /

शूटर आजीचं कोरोनामुळं निधन; बॉलिवूड अभिनेत्रींनी वाहिली श्रद्धांजली

शूटर आजीचं कोरोनामुळं निधन; बॉलिवूड अभिनेत्रींनी वाहिली श्रद्धांजली

शूटर आजींच्या निधनामुळं बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

  मुंबई 30 एप्रिल: उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध निशाणेबाज चंद्रो तोमर (Shooter Dadi Chandro Tomar) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. त्या 79 वर्षांच्या होत्या. संपूर्ण देशात त्यांना शूटर दादी म्हणून ओळखलं जायचं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. (coronavirus) परंतु उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली. शूटर आजींच्या निधनामुळं बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. वयाच्या साठीनंतर त्यांनी बंदुक उचलून नेमबाजी शिकली. इतकंच नव्हे तर त्यांनी अनेक आंतराष्ट्रीय नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता. त्यांची जिद्द आणि उत्साह पाहून अनेक मोठमोठे स्पर्धक आश्चर्यचकित व्हायचे. त्यांच्या आयुष्यावर आधारित अलिकडेच एका चित्रपटाची देखील निर्मिती केली गेली होती. या चित्रपटात भूमी पेडणेकरनं त्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला समिक्षक आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळाला होता. या चित्रपटाचं नाव सांड की आंख असं असं आहे. या चित्रपटामुळं संपूर्ण देशातील लोक चंद्रो तोमर यांना शूटर दादी म्हणून ओळखु लागले. देशभरातील चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'आता आयुष्य तसं राहिलं नाही पण..'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक
  View this post on Instagram

  A post shared by Bhumi (@bhumipednekar)

  भारतात रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Corona vaccination, Covid cases

  पुढील बातम्या