धक्कादायक! लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका

धक्कादायक! लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका

आज सकाळी तमिळ (south actor)अभिनेता विवेकला (vivek)रुग्णालयात दाखल(hospitalised) करण्यात आलं आहे. त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका (heart attack)आला होता. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र अंतर्गत माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल- 2020 हे वर्ष बॉलीवूडसाठी(bollywood) अतिशय वाईट ठरलं होतं. 2021 मध्ये सुद्धा वाईट घटनाक्रम सुरुचं आहे. आज सकाळी तमिळ (south actor)अभिनेता विवेकला (vivek)रुग्णालयात दाखल(hospitalised) करण्यात आलं आहे. त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका (heart attack)आला होता. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र अंतर्गत माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

विवेक यांचा जनसंपर्क अधिकारी (PRO)निखील मुरुग्गन (nikhil muruggan)याने माहिती देत म्हटलं आहे, विवेक यांना सकाळी जोरात चक्कर आली होती. त्यावेळी ते त्यांच्या कुटुंबाशी गप्पा मारत होते. मात्र अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध झाले. आणि त्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. सध्या ते वडापलानी येथील ‘SIMS’ या रुग्णालयात आहेत. उपचारानंतर त्यांना शुद्ध आल्याचंही म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Actor_Vivekh (@actorvivekh)

आत्ता योगायोग म्हणाव की अजून काही, मात्र फक्त एक दिवस आधी विवेक यांनी कोरोनाची लस टोचून घेतली होती. कोरोना लशीबाबत बरेच गैरसमज नागरिकांत आहेत. आणि या घटनेनंतर जास्तचं भीती निर्माण झाली आहे. मात्र विवेक यांच्या कुटुंबातील लोकांनी हे स्पष्ट केलं आहे, की लस घेतल्यानंतर विवेक अगदी व्यवस्तीत होते. कोरोना लशीचा आणि हृदयविकाराचा काहीही संबंध नाहीय.

(अवश्य वाचा: इन्स्टाग्रामवर 'Black And White' फोटो शेअर करत विद्याने सांगितली खूप मोठी गोष्ट  )

कोरोनाच्या लशीबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती कमी करण्यासाठी विवेक यांनी ही लस घेतली होती. त्यांनी कोणत्याही खाजगी रुग्णालयात लस घेण्याऐवजी एका सरकारी रुग्नालायात लसीकरण केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी लोकांना कोरोना लस टोचून घेण्याची विनंतीसुद्धा केली होती.

(अवश्य वाचा:'इथं लोक मरतायेत आणि तू...', 'त्या' VIDEO मुळे पूजा बेदी होतेय ट्रोल )

विवेक हे तमिळ मधील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहेत. त्यांनी 1980 मध्ये बालाचंदर यांच्या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी तमिळमध्ये अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्यांनी सुपरस्टार रजनीकांत आणि विजयसोबत सुद्धा काम केलं आहे. त्यांना चित्रपटातील उत्तम कामगिरीसाठी ‘पद्मश्री’पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्यांना शेवटी ‘Dharala Prabhu’ या चित्रपटात बघण्यात आलं होतं. याच चित्रपटावरून हिंदी रिमेक ‘विकी डोनर’ बनवण्यात आला होता. त्यामध्ये अभिनेता आयुष्यमान खुरानाने अभिनय केला आहे.

Published by: Aiman Desai
First published: April 16, 2021, 8:09 PM IST

ताज्या बातम्या