मुंबई, 08 ऑक्टोबर : सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि टिकटॉक स्टार (TikTok Star) असणाऱ्या प्रतिक खत्रीचा मृत्यू झाला आहे. त्याचा असे अचानक निघून जाणे सर्वांसाठी धक्कादायक होते. मंगळवारी रात्री एका कार अपघातात प्रतिकने जीव गमावला. प्रतिक सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होता. इन्स्टाग्रामवर त्याचे 42 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल देखील झाले आहेत.
मीडिया अहवालानुसार प्रतिक मंगळवारी रात्री उशिराने देहरातून याठिकाणी असणाऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी बागपत इथून निघाला होता. तो जेव्हा साखन कला याठिकाणी पोहोचले तेव्हा एका ट्रकने जोरदार धडक दिली. त्याठिकाणी जागीच प्रतिकचा मृत्यू झाल्याचे या मीडिया अहवालात म्हटले आहे.
त्याच्या जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. अभिनेत्री आणि टिकटॉक स्टार आशिका भाटिया हिने देखील सोशल मीडियावर प्रतिकबरोबरचा फोटो शेअर करत तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. तिने असे लिहले आहे की, 'RIP, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे'.
(हे वाचा-अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच! सीबीआयने AIIMS चा अहवाल केला मान्य)
View this post on Instagram
भाविका मोटवानीने देखील त्याच्याबरोबचा फोटो पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर प्रतिकचे 42 हजारहून जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचे चाहते दिवसेंदिवस वाढत होते. मात्र प्रतिक खत्रीच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.