‘त्याच्यापासून एक डान्स स्टुडंट प्रेग्नन्ट होती...’ एक्स बॉयफ्रेंडवर भडकली सना खान

‘त्याच्यापासून एक डान्स स्टुडंट प्रेग्नन्ट होती...’ एक्स बॉयफ्रेंडवर भडकली सना खान

सनानं मालविनपासून त्याचीच एक वयानं लहान असलेली स्टुडंट प्रेग्नन्ट होती असा धक्कादायक खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : टीव्ही आणि सिने अभिनेत्री सना खान मागच्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. सना खान मागच्या बऱ्याच काळापासून डान्स कोरिओग्राफर मालविन लुइससोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती अनेकदा त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असे. पण काही दिवसांपूर्वी तिनं तिचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सना खाननं एक्स बॉयफ्रेंड मालविनवर फसवणूक केल्याचा आरोप करत त्याच्यामुळे ती कशाप्रकारे डिप्रेशनमध्ये होती याचा धक्कादायक केला आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सनानं सांगितलं होतं कशाप्रकारे मालिवननं बाकी काही मुलींसाठी तिचा विश्वासघात केला होता. त्यानंतर आता तिनं मालविनबाबत नवे खुलासे केले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलेल्या पोस्टमध्ये सनानं मालविनपासून त्याचीच एक वयानं लहान असलेली स्टुडंट प्रेग्नन्ट होती असा धक्कादायक खुलासा केला आहे. याशिवाय तो त्याच्या स्टुडंटसोबत फ्लर्ट करत असे असंही तिनं म्हटलं आहे.

ज्याला करायचं होतं डेट, त्याची झाली भेट! रिंकू राजगुरूनं शेअर केला PHOTO

सनानं बुधवारी तिच्या इन्स्टाग्रावरुन तिच्या चाहत्यांशी लाइव्ह चॅट केलं. यादरम्यान तिनं मालविनसंबंधी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं, मालविन माझ्याशी वारंवार खोटं बोलत असे. त्यानं अनेकदा माझा विश्वासघात केला होता. मी त्याच्याशी आधीच ब्रेकअप केला होता. कारण त्यानं त्यानं त्याच्या मित्रांसमोर माझा अपमान केला होता. त्यानं मला त्याच्या दारु पिण्याविषयी सुद्धा खोटं बोललं होतं. त्यानं मी दारु पिणं सोडलं आहे असं सांगितलं होतं. तसेच मी या नात्याबद्दल सोशल मीडियावर शेअर करावं यासाठी त्यानं माझ्यावर दबाव टाकला होता. पण मला आता समजलं की त्यानं हे सर्व त्याची प्रसिद्धी करून घेण्यासाठी केलं होतं.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा जागतिक स्तरावर नवा विक्रम, केली इतक्या कोटींची कमाई

सनानं तिच्या लाइव्ह चॅटमध्ये सांगितलं, माझं दुसऱ्या कोणासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करणं. त्याला आवडत नव्हतं. त्यानं मला अनेक गोष्टींसाठी बंदी घातली होती. लोक त्यांच्या गुरुचा सन्मान करतात. पण अशा वक्तींचं काय जे त्यांच्या विद्यार्थ्यांशीच असं वर्तन करतात. हे सर्व सांगताना अचानक तिला रडू कोसळलं आणि हे लाइव्ह चॅट तिनं बंद केलं.

सनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, माफ करा मला जावं लागलं. कारण मी आता माझ्या भावना थांबवू शकत नाही. हे अश्रू त्याच्यासाठी नव्हते. पण त्यासाठी होते ज्याच्यासाठी मी एवढ्या वेदना आणि समस्या सहन केल्या तो याच्या योग्यतेचा नव्हता. त्या मुलींबद्दल विचार करणं माझ्यासाठी अधिकच त्रासदायक आहे. सना खान 'बिग बॉस 11' मध्ये दिसली होती. यानंतर ती सलमान खानच्या 'जय हो' सिनेमातही दिसली होती.

‘उद्या माझे ड्रायव्हर-मेकअपमन पण अवॉर्ड देतील’ सलमाननं सांगितलं बॉलिवूडचं सत्य

First published: February 20, 2020, 3:29 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या