मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संजय दत्तच्या मुलीचा Ex Boyfriend बद्दल धक्कादायक खुलासा; म्हणते, 'मला वाईट वागणूक द्यायचा'

संजय दत्तच्या मुलीचा Ex Boyfriend बद्दल धक्कादायक खुलासा; म्हणते, 'मला वाईट वागणूक द्यायचा'

संजय दत्तची मुलगी त्रिशलाने आपल्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे

संजय दत्तची मुलगी त्रिशलाने आपल्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे

संजय दत्तची मुलगी त्रिशलाने आपल्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 5 फेब्रुवारी : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याची मुलगी त्रिशला सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असते. तिचे फोटो चाहते पसंतही करतात. अनेकदा त्रिशला चाहत्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देते. अशाच एका प्रश्नाचं उत्तर पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तिने आपल्या प्रेमसंबंधाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर एका युजरने त्रिशलाला तिने प्रेमसंबंधात काही चूक केल्याचा प्रश्न विचारला होता. यावर त्रिशलाने सविस्तर उत्तर लिहिलं आहे. त्यात ती म्हणते की, - काही वर्षांपूर्वी मी ज्या व्यक्तीला डेट करत होती, हा प्रकार त्याच्यासोबत घडलेला आहे. याबद्दल ती म्हणते की, मी त्याच्यासाठी आत्मसन्मान मागे ठेवला आणि त्याच्यासाठी आयुष्यात अनेक बदल केले. मात्र तो मला अत्यंत हीन पणे वागवत राहिला. असं असतानाही तो तणावात असेल या विचाराने मी सर्व सहन करीत होते. उद्याचा दिवस चांगला येईल, या विचाराने मी त्याच्यासोबत होते. मात्र दुर्देवाने तो चांगला दिवस कधीच आला नाही.

ती पुढे म्हणते माझ्या एक्स प्रियकराने मला सर्व मित्र-मैत्रिणींपासून वेगळं करण्यास सुरुवात केली. आणि दुर्देवाने मला याची जाणीवही झाली नाही. मी जेव्हा घराबाहेर जात असेल त्याला मेसेज करुन सांगत असे. घरी आल्यानंतर तो मला खूप वाईटपणे वागवत होता. माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी मी मित्र-मैत्रिणींना भेटणं कधी केलं होतं. तो मात्र त्याच्या मित्रांसोबत बाहेर जात होता..इन्जॉक करीत होता.

मला स्वत:ची लाज वाटते

आपल्या या वाईट प्रेमसंबंधाचा खुलासा केल्यानंतर त्रिशलाने लिहिलं की, मी वर्षानुवर्षे स्वत:वर काम केलं आणि माझ्या या अशा वागणुकीबद्दल स्वत:लाच प्रश्न उपस्थित केला. मी स्वत:च्या टॉक्सिक वागणुकीसाठी स्टँड घेतला आणि त्याचा स्वीकार केला. आज मला त्या वागणुकीची खूप लाज वाटते. मात्र आता मी या अनुभवातून बरंच काही शिकले आहे.

संजय दत्त आणि त्याची दिवंगत पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे त्रिशला

त्रिशला संजय दत्त आणि त्यांची दिवंगत पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. 33 वर्षीय त्रिशला अमेरिकेत राहते. तिचं पालन-पोषण आजी-आजोबांनी केलं आहे. संजय दत्त याची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचं 1996 मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे निधन झालं होतं. त्यावेळेस त्रिशला केवळ 8 वर्षांची होती.

First published:

Tags: Bollywood, Sanjay dutt