S M L

...म्हणून प्रियांका चोप्रानं 'भारत' सोडला

प्रियांका चोप्रानं 'भारत' सोडलाय. सिनेमाच्या दिग्दर्शकानं तसं ट्विट केलंय.

Updated On: Jul 27, 2018 12:25 PM IST

...म्हणून प्रियांका चोप्रानं 'भारत' सोडला

मुंबई, 27 जुलै : प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. तिला मेहबूब स्टुडिओच्या बाहेर पाहिलं होतं. त्यामुळे भारत सिनेमात सलमान आणि प्रियांका दिसणार अशा बातम्या सुरू होत्या. त्यामुळे फॅन्सही खूश होते. पण आता एक बातमी आलीय. त्यामुळे फॅन्सची खूप निराशा होणार आहे. प्रियांका चोप्रानं 'भारत' सोडलाय. सिनेमाच्या दिग्दर्शकानं तसं ट्विट केलंय.  त्यावरून तर असं जाणवतंय की प्रियांका चोप्रा तिचा बाॅयफ्रेंड निकसोबत लग्न करतेय. आणि त्यामुळेच ती सिनेमा सोडतंय.

Loading...
Loading...

जवळजवळ 10 वर्षांनी प्रियांका-सलमान सिनेमात एकत्र दिसणार होते. त्यामुळे सगळे खूश होते. पण प्रियांका आता निकसोबत लग्न करतेय म्हटल्यावरही प्रियांकाचे चाहते खूश झालेत.  नुकताच तिने काही दिवसांचा भारत दौरा केला होता. या दौऱ्यात तिच्यासोबत निकही दिसला. दोघंही गोव्यात काही दिवस सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. त्यामुळे लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता.

हेही वाचा

बाॅलिवूड स्टार्सचे नवे फोटो तुम्ही पाहिलेत का?

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री बॉलिवूड नायिकांना देऊ शकते टक्कर

'संजू' सिनेमाच्या निर्मात्यांना अबू सालेमनं पाठवली नोटिस

भारत सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय. सिनेमात दिशा पटानी, तब्बूही आहेत . आता पुन्हा अभिनेत्रीचा शोध सुरू करावा लागणार आहे. या बहुचर्चित सिनेमात कोण अभिनेत्री असणार, सलमानची जोडी कोणाबरोबर असणार हे प्रश्न आता सगळ्यांना पडलेत.  प्रियांकानं सोनाली बोसचा 'स्काय इज पिंक' हा सिनेमाही साईन केलाय.

प्रियांकानं न्यूयाॅर्कला नवं घरही खरेदी केलंय. 30 कोटींचं हे घर 82मजली इमारतीत आहे. या आलिशान घराचीही चर्चा सुरू होती. प्रियांका निकसोबत त्याचा भाऊ आणि वहिनी यांनाही वेळ देते. त्यामुळे देसी गर्ल आता हाॅलिवूडची सूनबाई होणार यावर शिक्कामोर्तब झालं एकदाचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 11:14 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close