मुंबई, 23 फेब्रुवारी- अभिनेत्री
( Tv Actress) पूजा बॅनर्जी
(Puja Banerjee) तिच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा तिच्या खाजगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. छोट्या पदड्यावरील सालस आणि सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणारी पूजा बॅनर्जी खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. पूजा बॅनर्जीबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूजा खूप लहान वयात प्रेमात पडली होती आणि यामुळे ती वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून गेली होती.
अभिनेत्रीने एका टॉक शोमध्ये या गोष्टीचा खुलासा करत सांगितलं होतं. पूजाच्या म्हणण्यानुसार, ती वयाच्या १५ व्या वर्षी प्रेमात पडली होती. लहान वयातच प्रेमात पडल्यामुळे तिला हेच आपलं जग वाटू लागलं होतं. आणि म्हणूनच ती त्या व्यक्तीसोबत घर सोडून पळून गेली होती. त्यानंतर ती कधीच घरी परतली नाही. पूजाला घर सोडल्याचा कोणताही पश्चाताप होत नाही.
तिने याविषयी पुढे सांगितले की, घरातून पळून गेल्यानंतर तिने कधीही घरी परत न जाण्याचा निर्णय घेतला होता. आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांना मान खाली घालावी लागली होती तर अशा गोष्टींपासून आपल्या आईवडिलांना दूर ठेवण्याचं तिने ठरवलं होतं. त्यामुळेच तिने मुंबईत राहून संघर्ष केला आणि आपले करिअर घडवण्यात यश मिळवले. यादरम्यानच पूजाची कुणाल वर्माशी भेट झाली होती.

पूजाने अभिनेता कुणाल वर्मासोबत लग्न केले आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांमध्ये पूजा आणि कुणाल या जोडीचा समावेश होतो. 'तुझ संग प्रीत लगाई सजना' या मालिके दरम्यान पूजा-कुणालची पहिली भेट झाली होती. आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनी 9 वर्षे एकमेकांना डेट केले आहे. दोघांनी यापूर्वी मार्च 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते आणि नंतर नोव्हेंबर 2021 मध्ये दोघांनीही पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता. विशेष म्हणजे या लग्नात त्यांचं बाळदेखील होतं. कारण कोर्ट मॅरेजनंतर सहा महिन्यांनी अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला होता.
पूजा बॅनर्जीने 'तुझ संग प्रीत लगाई सजना' मालिकेतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनतर अभिनेत्रीने 'देवों के देव महादेव, माँ वैष्णोदेवी, कुबुल है,सर्वगुण संपन्न, बिग बॉस बांगला, कॉमेडी नाईट्स बचाओ अशा अनेक कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.