मुंबई, 03 जानेवारी: ड्रक केसमध्ये नाव आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सारा अली खानला आधी हिरोपंती 2 (Heropanti 2) या सिनेमातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर आता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor)अॅनिमल सिनेमातूनही तिला काढून टाकण्यात आलं आहे.
1 जानेवारी रोजी संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. अॅनिमल या सिनेमामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट आहे. सारा अली खानही या चित्रपटात झळकणार होती पण तिच्याऐवजी आता तृप्ती डिमरीचं नाव फायनल करण्यात आलं आहे. सारा अली खानचा कुली नंबर 1 हा सिनेमा 25 डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटही प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात अयशस्वी ठरला होता. त्यामुळे सारा अली खानच्या करिअरमध्ये सध्या एकामागून एक वादळं येत आहेत.
तृप्ती डिमरी या आधी लैला मजनू आणि बुलबुल चित्रपटांमध्ये झळकली होती. अॅनिमल सिनेमासाठी सारा आणि तृप्ती या दोघींनीही स्क्रीन टेस्ट दिली होती. सारापेक्षा तृप्तीचं काम जास्त आवडलं असं कारण देत साराला सिनेमातून डच्चू देण्यात आला आहे. तृप्तीला नुकताच ‘बुलबुल’ या वेब ओरिजनलमध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. बुलबुलची निर्मिती अनुष्का शर्मा यांनी केली होती. बुलबुलमधील तृप्तीच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.
दरम्यान अॅनिमल सिनेमाचा टीझर 1 जानेवारीला लाँच झाला आहे. या सिनेमात परिणिती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असेल तर तृप्तीचा देखील महत्वाचा रोल असल्याचं सिनेमाच्या टीमकडून सांगण्यात येत आहे.