Home /News /entertainment /

धक्कादायक! माही विजला अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ अन् बलात्काराची धमकी; अभिनेत्रीची पोलिसांत धाव

धक्कादायक! माही विजला अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ अन् बलात्काराची धमकी; अभिनेत्रीची पोलिसांत धाव

टीव्ही अभिनेत्री (Tv Actress) माही विज (Mahi Vij) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच बिग बॉस 16 मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या माहीने शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक ट्विट करून सर्वांना चकित केलं आहे.

    मुंबई,8  मे- टीव्ही अभिनेत्री   (Tv Actress)  माही विज   (Mahi Vij)  सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच बिग बॉस 16 मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या माहीने शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक ट्विट करून सर्वांना चकित केलं आहे. अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं की, एका व्यक्तीने तिला भररस्त्यात थांबवले आणि शिवीगाळ केली. हा व्यक्ती इतक्यावरच थांबला नाही तर, त्याने बलात्काराची धमकीही दिली. असा व्हिडीओ  (Video) शेअर करून माहिने मुंबई पोलिसांना  (Mumbai Police) याप्रकरणी मदतीची विनंती केली आहे. माहिने आपल्या ट्विटर हॅन्डलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. माही विजने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कोणीही दिसत नाही. केवळ एका वाहनाची नंबर प्लेट दिसत असून काही लोकांचा आवाज येत आहे. हा व्हिडीओ  अजिबात स्थिर नाहीय, याचाच अर्थ हा व्हिडीओ घाईघाईत बनवलेला दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत टीव्ही अभिनेत्री माही विजने लिहिलंय- 'या व्यक्तीने माझ्या कारला धडक दिली आणि त्यानंतर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्याने माझ्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. त्याच्या पत्नीलाही राग आला आणि त्यांनतर तिने त्या व्यक्तीला विषय सोडण्यास सांगितले.'अभिनेत्रीने मुंबई पोलिसांना टॅग करत त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मला मदत करा असं आवाहन केलं आहे'. माहीच्या या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनीसुद्धा उत्तर दिलं आहे. ट्विट करत, मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीला जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदवण्याची सूचना केली आहे. माहीच्या या ट्विटवर लोक प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणाचा तपास कसा सुरु आहे पुढे नेमकं काय झालंय हे अजून समजलेलं नाहीय.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Mumbai police, Tv actress

    पुढील बातम्या