Home /News /entertainment /

Exclusive: जॅकलिन, नोरासह आणखी 10 अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात, धक्कादायक माहिती आली समोर

Exclusive: जॅकलिन, नोरासह आणखी 10 अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात, धक्कादायक माहिती आली समोर

महाठग सुकेश चंद्रशेखरबद्दल (Sukesh Chandrashekhar) दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. आजही ईडीकडून अशीच खळबळजनक माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 17 डिसेंबर-  महाठग सुकेश चंद्रशेखरबद्दल  (Sukesh Chandrashekhar)  दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. आजही ईडीकडून अशीच खळबळजनक माहिती समोर आली आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीच नव्हे तर तब्बल 10 अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.आमचे प्रतिनिधी आशिष महर्षी यांनी ही माहिती दिली आहे. सुकेश चंद्रशेखर हा तिहार तुरुंगातून एक आलिशान कार्यालय चालवत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर युनिटेक ग्रुपचे मालक संजय चंद्रा यांच्या कार्यलयाचादेखील तो वापर करत होता. तिहार तुरुंगात असताना त्याची चंद्रासोबत जवळीकता निर्माण झाली होती. तसेच सुकेश चंद्रशेखरची पत्नी लीना मारिया पॉल वारंवार त्याला भेटायला तुरुंगात येत होती. मात्र ती रजिस्टरमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद करत नसल्याचं ईडीने म्हटलं आहे. तुरुंगात मिळत होत्या सर्व सुखसुविधा- तिच्या निवेदनात असं सांगण्यात आलं आहे, कि त्याच्या कार्यालयात टीव्ही, फ्रिज, सोफा अशा सर्व सोईसुविधा उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे तर पिण्यासाठी त्याला मिनरल वॉटरच्या बाटल्या मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे सुकेश चंद्रशेखर जेलमध्ये चिकन पार्टीसुद्धा करत असे. तसेच त्यानं अनेकवेळा या पार्ट्यांमध्ये महिला मैत्रिणींना आमंत्रित केलं आहे. अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री त्याला तुरुंगात भेटायला येत असल्याचं समोर आलं आहे. सुकेश चंद्रशेखर आपल्या या सर्व सोईसुविधा अशाच चालू ठेवण्यासाठी, तुरुंग अधिकाऱ्यांना दरमहा 1 कोटी रुपये सेट असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही व्यतिरिक्त आणखी 10 अभिनेत्री त्याच्या संपर्कात आहेत. त्यांनी त्याची तुरुंगात येऊन बहेतसुद्धा घेतली आहे. आतापर्यंत ईडीने 3 अभिनेत्र्यांची चौकशी केली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: ED, Jacqueline fernandez

    पुढील बातम्या