मुंबई, 31 जुलै- महाराष्ट्र पोलिसांनी (
Maharashtra Police) अल्पवयीन मुलांच्या अश्लील चित्रफित
(Child Pornography) तयार करण्याच्या आणि त्या इंटरनेटवर अपलोड करण्याच्या आरोपाखाली गेली 18 महिन्यात 105 जणांना अटक केली आहे. तर 213 गुन्हे दाखल केले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही धक्कादायक माहिती शुक्रवारी दिली आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय शिंत्रे यांनी सांगितलं आहे, की हे गुन्हे गेल्या 18 महिन्यांत NCRB (नेशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) द्वारा जाहीर केलेल्या ‘टिपलाईन रिपोर्ट’ च्या आधारे नोंदविण्यात आले आहेत.
बाल पोर्नोग्राफिची ‘टिपलाईन रिपोर्ट’ अमेरिकेमध्ये स्थायिक असलेल्या राष्ट्रीय बेपत्ता आणि पिडीत बालकांच्या केंद्रामार्फत बनवण्यात येते. हा रिपोर्ट सोशल मीडिया, विविध सर्च इंजिन, विविध वेबसाईट आणि इतर सोशल माध्यमांवर कटाक्ष नजर ठेऊन बनवण्यात येते. असं सांगण्यात आलं होतं की, NCMEC च्या तपास ब्युरो
(FBI) च्या मदतीतून नियमितपणे भारताच्या NCRB (नेशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) सोबत एक रिपोर्ट शेयर करण्यात येतो. जो सर्व राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येतो.
(हे वाचा:
मनोज वाजपेयी चारित्र्यहीन माणूस'; सुनील पालच्या टीकेवर अभिनेत्याचं सणसणीत उत्तर)
या रिपोर्टमध्ये त्या IP अड्रेस आणि ठिकाणांची नावे असतात, जिथे अश्लील साहित्याचा वापर केला जातो. या आधारे मग सायबर पोलीस आपली तपासणी सुरु करतात. आणि आरोपींचा शोध घेतात. पोलिसांच्या मते, महाराष्ट्र सायबरने राज्यात बाल पोर्नोग्राफीवर लगाम लावण्यासाठी सन 2019-20 मध्ये ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’ सुरु केलं होतं. 11, 122 ‘टिपलाईन रिपोर्ट’मधून सर्वात जास्त 5,699 रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आली आहे. त्यानंतर 4,496 मुंबई, 364 ठाणे, 302 नागपूर आणि 90 औरंगाबाद तसेच अन्य ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
(हे वाचा:
मीडियावर भडकली, शिल्पा शेट्टीची थेट हायकोर्टात धाव)
तसेच पोलिसांनी सांगितलं की, या रिपोर्टच्या आधारे नागपूर पोलिसांनी सर्वात जास्त म्हणजे तब्बल 38 गुन्हे नोंद केले आहेत. पोलिसांच्या मते, महाराष्ट्र सायबर त्या जिल्ह्यांचा शोध घेत आहे, जिथून बाल पोर्नोग्राफी कन्टेन्ट तयार करून प्रक्षेपित केल जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.