• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • धक्कादायक! अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिसांनी सुरु केला तपास

धक्कादायक! अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिसांनी सुरु केला तपास

मनोरंजनसृष्टीतून (Film Industry) नेहमीच विचित्र गोष्टी समोर येत असतात. या गोष्टी ऐकून सर्वसामान्यांना अनेकवेळा धक्का बसतो.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर- मनोरंजनसृष्टीतून (Film Industry) नेहमीच विचित्र गोष्टी समोर येत असतात. या गोष्टी ऐकून सर्वसामान्यांना अनेकवेळा धक्का बसतो. अनेकवेळा चाहते कलाकरांना फार विचित्र भेटवस्तू(Gifts From Fans) पाठवून त्यांना त्रास देत असतात. असंच काहीसं झालंय एका २८ वर्षीय अभिनेत्रीसोबत. या अभिनेत्रीला तर चक्क एक अज्ञात व्यक्ती गेली दोन महिने सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून त्रास देत आहे. पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित अभिनेत्रीने खुलासा करत म्हटलं आहे, 'एक अज्ञात व्यक्ती गेली दोन महिने तिला विचित्र भेटवस्तू पाठवून त्रास देत आहे. त्या व्यक्तीने आजपर्यंत मला ८ वेळा भेटवस्तू पाठवली आहे. यामध्ये अंतर्वस्त्रे आणि काही सेक्स टॉय पाठवण्यात येत आहे. सुरुवातीला एक-दोन वेळा मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केला. मात्र वारंवार तेच घडू लागल्याने मला पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे. त्यांनतर आंबोली पोलीस या सर्व प्रकारचा तपास घेत आहेत. (हे वाचा:Bigg Boss Marathi: स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी; ट्विट करत म्हटलं..) यावर बोलताना आंबोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे, 'या सर्व प्रकरणामध्ये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनतर अजून महिलेला काही निदर्शनास आलेलं नाहीय. मात्र या प्रकरणात काही शॉपिंग ऑर्डर दिलेले नंबर हाती लागले आहेत. त्यानुसार पुढील तपास केला जात आहे'.
  Published by:Aiman Desai
  First published: