Home /News /entertainment /

धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर अश्लील कृत्य; आरोपींनी टॉप फाडला, लोकांनी बनवला VIDEO

धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर अश्लील कृत्य; आरोपींनी टॉप फाडला, लोकांनी बनवला VIDEO

अभिनेत्रीने आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाचा (Sexual Assault) धक्कादायक खुलासा सोशल मीडियाद्वारे केला आहे. पहिल्यांदा रेल्वे स्टेशन आणि नंतर रेल्वेमध्ये या अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर आरोपींनी अभिनेत्रीचा टॉपदेखील फाडला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 3 डिसेंबर-   महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रत्येक देशात महत्वाचा आहे.फक्त सर्व सामान्य मुलीच नव्हे तर अनेक अभिनेत्रींनासुद्धा काही वाईट अनुभव आलेले ऐकायला मिळत असतं. असच काहीसं घडलं आहे, ब्रिटनच्या   (Britain)   एका टीव्ही अभिनेत्रीसोबत  (Tv Acress). अभिनेत्रीने आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाचा   (Sexual Assault)  धक्कादायक खुलासा सोशल मीडियाद्वारे केला आहे. पहिल्यांदा रेल्वे स्टेशन आणि नंतर रेल्वेमध्ये या अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर आरोपींनी अभिनेत्रीचा टॉपदेखील फाडला आहे.
  ब्रिटनमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री म्हणून लोटी लायनला ओळखलं जातं. या अभिनेत्रीने नुकताच आपल्यासोबतच घडलेल्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रकारचा खुलासा केला आहे. 'द सन' ने च्या एक रिपोर्टनुसार २४ वर्षीय अभिनेत्री लोटी लायन ट्रेनने प्रवास करत होती. ती ट्रेनच्या प्रतीक्षेत स्टेशनवर थांबली होती. यावेळी ती फोनवर बोल्ट होती. दरम्यान त्यांच्याजवळ काही मुले आले. आणि त्यांनी अभिनेत्रीला घेरून तिच्यासोबत अश्लील वर्तन करायला सुरुवात केली. इतक्याच वरच ते थांबले नाहीत. तर पुढे त्यांनी अभिनेत्रींच्या अंगावरील टॉपदेखील फाडला. हे सर्व सुरु असताना उपस्थित लोक अत्यंत लाजिरवाणपणे हा प्रकार कॅमेरात कैद करत होते. मदतऐवजी उपस्थितांनी बनवला व्हिडीओ- अभिनेत्री लोटी लायनने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगत, खंत व्यक्त केली आहे. खुलासा करत लोटीने म्हटलं आहे, कि 'हा सर्व प्रकार सुरु असताना. तिथे अनेक लोक होते. मात्र त्या समूहाने मला वाचवण्याचा प्रयत्न करायचं दूरच उलट त्यांनी हसत त्या संपूर्ण घटनेला आपल्या कॅमेरात कैद केलं. हे सर्व लोक व्हिडीओ बनवण्यामध्ये व्यस्त होते'. या सर्व प्रकाराने अभिनेत्री हादरून गेली आहे.त्यांनतर अभिनेत्रीने सांगितलं, कि मी या घटनेमुळे फार घाबरले होते. मला काहीच कळत नव्हतं. तोपर्यंत स्टेशनवर माझी ट्रेन आली. आणि मी त्यात चढले. मला वाटलं आता मी सुरक्षित आहे. आणि मी सुसकेचा निःश्वास सोडत मागे वळून पाहिलं, मला पुन्हा धक्का बसला. कारण ती मुले पुन्हा ट्रेनमध्ये चढली होती. त्यांनी माझ्याजवळ येत परत अश्लील चाळे सुरु केले. ज्यावेळी टीसीला हा प्रकार समजला, त्यांनी माझ्याजवळ धाव घेत माझी यातून सुटका केली. त्या मुलांनी तेथून पळ काढला. आणि मला फर्स्ट कम्फर्टमेन्टमध्ये शिफ्ट करण्यात आलं. अभिनेत्रीने हा सर्व प्रकार सोशल मीडियाद्वारे सर्वांनासमोर आणला आहे. तसेच अभिनेत्रीने या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा सर्व प्रकार मार्क महिन्यात घडला होता. जो आता सर्वांच्या समोर आला आहे. त्यांनतर अभिनेत्रीने रात्री ट्रेन प्रवास करणाऱ्या सर्व महिला आणि मुलींना सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय अशा घटनेची वेळीच तक्रार करण्याचाही सल्ला दिला आहे. अन्यथा आरोपींच बळ आणखी वाढेल अशी चिंता तिने व्यक्त केली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Actress, Sexual assault

  पुढील बातम्या