मुंबई, 18 मे : नुकताच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्राझीलचा (Brazil) प्रसिद्ध गायक (Singer) एम. सी. केविनचा (M.C. Kevin) हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. केविन रियो द जेनेरियोच्या एका हॉटेलमधील पाचव्या मजल्यावरून खाली पडला. आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. केविन अवघ्या 23 वर्षांचा होता. एक तरूण कलाकर गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे. तसेच त्याच्या या संशयास्पद मृत्यूमुळे (Death) अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत.
View this post on Instagram
केविन हा अवघ्या 23 वर्षांचा तरुण गायक होता. तो रियो द जेनेरियोच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. तेथील पाचव्या मजल्यावरून पडल्यानं त्याचं आकस्मिक निधन झालं. महत्वाचं म्हणजे केविनने केवळ 2 आठवड्यांपूर्वी लग्न केल होतं. केविनने आपली गर्लफ्रेंड डीओलेन बेजेरा सोबत लग्न केलं होतं.
View this post on Instagram
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, केविन या हॉटेलच्या 11 व्या मजल्यावर थांबला होता. मात्र आपल्या काही मित्रांची भेट घेण्यासाठी तो त्या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर गेला होता. आणि तेथील बाल्कनीत उभा असताना, तो अचानक खाली कोसळला. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. केविनच्या या रहस्यमयी मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहते. तेथील स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहते.
(हे वाचा:Covid वर कशी मात केली हे सांगणार नाही', कोरोनामुक्त होताच कंगनाची अजब पोस्ट )
घटना घडल्यानंतर लगेच त्याठिकाणी फायर ब्रिगेड बोलवण्यात आलं होतं. त्यांनी केविनला रुग्णालयात सुद्धा दाखल केल होतं. मात्र रुग्णालयात जाताच केविनचा मृत्यू झाला. केविनच्या लग्नानंतर अवघ्या 2 आठवड्यांत झालेल्या या मृत्यूने सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. केविनची पत्नी एक क्रिमिनल लॉयर आहे.
(हे वाचा:तौत्केचा बॉलिवूडच्या महानायकाला फटका; शेल्टर उडून गेल्यानं ऑफिसमध्ये शिरलं पाणी )
ही घटना 16 मेला घडली आहे. त्यांनतर तिच्या पत्नीने आणि आईने सोशल मीडियावर पोस्ट करत ही दुख:द माहिती दिली होती. केविनने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपलं पहिलं गाणं रिलीज केल होतं. त्याच्या अशा आकस्मिक जाण्यानं सर्वांनाचं धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment