मुंबई, 30 जून- बॉलिवूडची (Bollywood) मस्त-मस्त गर्ल म्हणून ओळख असणाऱ्या रविना टंडनचे (Ravina Tandon) आजही तितकेच चाहते आहेत. रविना नेहमीचं आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबद्दल चर्चेत असते. आजसुद्धा रविनाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत, जो फारच कमी लोकांना माहिती आहे. हा किस्सा तितकाच फिल्मी आहे. कारण तो रविना आणि तिच्या सवतीमध्ये घडला होता. पाहूया असं नेमकं काय झालं होतं.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने डीस्ट्रीब्यूटर अनिल थडानीसोबत लग्नं केलं आहे. मात्र अनिलचं हे दुसर लग्नं होतं. याआधी अनिलने नताशा सिप्पी या मुलीशी लग्न केलं होतं. मात्र नताशाच्या आई वडिलांनी रविनामुळेच आपल्या मुलीचं लग्न तुटल्याचा आरोपदेखील केला होता. रविनामुळेच अनिलने नताशाला घटस्फोट देवून हे लग्न केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 2003 मध्ये अनिल आणि रविनाने साखरपुडा केला होता. त्यानंतर 2004 मध्ये या दोघांनी डेस्टीनेशन वेडिंग केलं होतं. राजस्थान, उदयपुरमध्ये हे लग्न अगदी शाही थाटामाटात पार पडलं होतं.
(हे वाचा:ओळखलं का फोटोतील चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका)
E 24 ने दिलेल्या एका ववृत्तानुसार, रविना आणि अनिलची पहिली पत्नी नताशा यांची कधीच समोरासमोर भेट झालेली नव्हती. मात्र 2006 मध्ये नवीन वर्षाचं निमित्त साधत फरहान अख्तर आणि रमेश सिधवानी यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. आणि यामध्ये रविना आणि अनिल थडानी व्यतिरिक्त पहिली पत्नी नताशा सिप्पीसुद्धा उपस्थित होती. याच पार्टीदरम्यान रविनाने नताशाच्या डोक्यावर वाईनने भरलेला ग्लास ओतला होता. असं झालं होतं की, पहिली पत्नी नताशा अनिलच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. त्याचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा परतण करत होती. त्यामुळे रविनाला राग आला होता. असं पार्टीत उपस्थित असणाऱ्या लोकांनी म्हटलं होतं. आणि जय्वेली रविना जेवण आणण्यासाठी बाजूला गेली तेव्हा नताशा अनिलजवळ आली आणि त्याच्याशी जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली.
(हे वाचा:मंदिरा-राजची जोडी होती खुपचं रोमँटिक; पाहा Unseen Photo )
हे सर्व पाहून रविना खुपचं भडकली. तिचा राग अनावर झाला, आणि तिने मागेपुढे काहीही न बघता. पार्टीतील सर्वांसमोर वाईनने भरलेला ग्लास नताशाच्या डोक्यावर रिकामा केला होता. या घटनेची खुपचं चर्चा झाली होती. आजही हा प्रसंग आठवला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.