मुंबई, 24 जून- बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि बिग बॉस 8 (Bigg Boss 8) ची स्पर्धक मिनिषा लांबा (Minisha Lamba) आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या खाजगी आयुष्याबाबत चर्चेत असते. पती रेयांश थामसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं तिनं म्हटलं होतं. अशातच तिने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अनेक अभिनेत्रींप्रमाणे तिनेसुद्धा बॉलिवूडची काळी बाजू मांडली आहे. मिनिषाने नुकताच सांगितलं की आपल्यालाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. मेकर्स बऱ्याचवेळा रात्री घरी बोलवत होते. असा खुलासा करत सर्वांनाचं धक्का दिला आहे.
View this post on Instagram
अलीकडेच मिनिषाने रेडीओ होस्ट सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली होती. यादरम्यान खुलासा करत, ती म्हणाली,’कोणत्याही क्षेत्रात जिथे पुरुष असतात, तिथे बहुतांश पुरुष हे असेच असतात. हे क्षेत्रसुद्धा तसचं आहे. निश्चितचं मलासुद्धा अशा गोष्टींचा सामना करावा लागला आहे. जसं की एखादी व्यक्ती चित्रपटाबद्दल बोलत नाही, तर म्हणते की तू रात्री डिनरसाठी का नाही येत? मिनिषा पुढे म्हणते, मी फिल्म मेकर्सना जास्तीत जास्त त्यांच्या कार्यालयातचं भेटण्यासाठी जोर देत असे.
(हे वाचा: HBD: जेव्हा अतुल अग्निहोत्री पडला सलमानच्या बहिणीच्या प्रेमात; वाचा काय घडलं)
मिनिषाने म्हटलं, मी सतत अशा गोष्टींकडे कानाडोळा करून त्यापासून स्वतःचा बचाव करत असे. यामुळे तिच्या करियरचं खूप मोठं नुकसानदेखील झालं. तिला हातातून अनेक प्रोजेक्ट घालवावं लागल्याचंही ती सांगते. एक-दोनवेळा तर अगदी हातात आलेले प्रोजेक्ट सोडावे लागले होते. मिनिषाने स्पष्टपणे सांगितलं आहे, की निर्माते हे नेहमीचं कार्यालये सोडून बाहेर भेटण्यावर जोर देत होते.
(हे वाचा: HBD: अभिनेताच नव्हे तर गायकही आहे अंकुश; पाहा अभिनेत्याच्या काही खास गोष्टी)
अभिनेत्री मिनिषा ललांबाने बॉलिवूडच्या काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केल आहे. हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, किडनॅप, वेल डन अब्बा, बचना ये हसीनो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच सन 2014 मध्ये ती बिग बॉस 8 मध्येही सहभागी झाली होती. सध्या ती आपल्या पहिल्या डिजिटल प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment