मुंबई, 3 ऑगस्ट- राज कुंद्रा पोर्नोग्राफी(Raj Kundra Pornography Case) प्रकरणामुळे चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे मॉडेल (Actress And Model) आणि अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) होय. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अनेक बाबतीत आपलं मत देत, गहना वशिष्ठ चर्चेत आली होती. नुकताच गहनाने न्यूड लाईव्ह सेशन करत सर्वांनाचं धक्का दिला आहे. काही तासांपूर्वी गहनाने आपल्या इन्स्टाग्रामवर हे लाईव्ह न्यूड सेशन केलं होतं.
View this post on Instagram
एकता कपूरच्या अडल्ट वेबसिरीज ‘गंदी बात’ मुळे गहना वशिष्ठला ओळख मिळाली होती. गहनाची नेहमीचं एक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री अशी ओळख आहे. मध्यंतरी तिला पोर्न शूटच्या संदर्भात अटकसुद्धा झाली होती. सध्या तिला जामीन मिळाला आहे. तसेच 19 जुलै रोजी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रालासुद्धा पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यावेळी गहनाने राज कुंद्राला सपोर्ट करत काही स्टेटमेंट दिले होते.
(हे वाचा: जीजू जेल में और...'; राज कुंद्रा प्रकरणामुळे सलूनमध्ये जाणारी शमिता झाली ट्रोल)
आत्ता गहना वशिष्ठने चक्क न्यूड लाईव्ह सेशन करत सर्वांनाचं धक्का दिला आहे. गहनाने हे लाईव्ह सेशन करत म्हटलं आहे, ‘नमस्कार मित्रांनो मी सध्या या लाईव्ह सेशनमध्ये तुमच्यासमोर न्यूड आली आहे. मी कोणतेच वस्त्र परिधान केलेलं नाहीय. मग मी तुम्हाला अश्लील दिसतेय का? किंवा मी पोर्न शूट करतेय असं तुम्हाला वाटते का?. मला फक्त इतकचं म्हणायचं आज मी तुमच्यासमोर लाईव्हमध्ये न्यूड आलेली असून तुम्हाला अश्लील वाटत नाहीय. आणि माझ्या दुसऱ्या व्हिडीओ किंवा फोटोंमध्ये चांगले कपडे अंगावर घालूनसुद्धा तुम्हाला न्यूड वाटते. तेव्हा तुम्हाला वाटतं की मी न्यूड शूट करत आहे. हे खुपचं चुकीचं आहे’. असं ती या लाईव्ह सेशनमध्ये म्हणते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment