मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बच्चन कुटुंबाच Vacation on; ऐश्वर्या-अभिषेक थांबलेल्या रिसॉर्टच्या खर्चात एक घर येईल

बच्चन कुटुंबाच Vacation on; ऐश्वर्या-अभिषेक थांबलेल्या रिसॉर्टच्या खर्चात एक घर येईल

आराध्याच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंब मालदीवमध्ये पोहोचलं आहे.

आराध्याच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंब मालदीवमध्ये पोहोचलं आहे.

आराध्याच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंब मालदीवमध्ये पोहोचलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 16 नोव्हेंबर : मुलगी आराध्या बच्चनच्या 10व्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनसोबत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे. संपूर्ण बच्चन कुटुंब हा खास प्रसंग मालदीवमध्ये आलिशान सुट्टीत साजरा करणार आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांचे चाहते त्यांचे व्हेकेशन फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दरम्यान, मालदीवच्या लक्झरी रिसॉर्टबद्दल अनेक रंजक गोष्टी समोर येत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनीही त्यांच्या सोशल अकाउंटवर या रिसॉर्टचे फोटो शेअर केले आहेत.

किंमत पाहून चाट पडला..

ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन मुलगी आराध्यासह मालदीवमधील एका लग्जरी रेसॉर्ट अमिलामध्ये थांबले आहेत. या रेसॉर्टमध्ये विविध प्रकारचे villas आहे. ज्यात रूफ वॉटर पूल विला, सनसेट वॉटर पूल विला, लॅगून वॉटर पूल विला आणि मल्टी बेडरूम रेजिडेंस यांचा समावेश आहे. ज्यातार विला प्राइवेट पूल आणि एका अनोख्या व्ह्यूसह आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक कोणत्या व्ह्यू असणाऱ्या विलात थांबले आहेत, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

मात्र वेबसाइटनुसार या रेसॉर्टमधील सर्वात स्वस्त विलासाठी एका रात्रीचे 76 हजार रुपये आकारले जातात. याशिवाय येथील सर्वात महागडा विल्याची (एक रात्र) किंमत 10.33 लाख इतरी आहे.

फोटो केले शेअर..

रविवारी ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन आपल्या विल्यातून दिसणारं दृश्य चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. या फोटोमध्ये ट्विन स्विमिंग पूल आणि खासगी बिच दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Jumi (@jumi.mohamed)

या फोटोमध्ये रेसॉर्टमधील नारळाची झाड आणि समुद्र अधिक सुंदर रुप देत आहे. ऐश्वर्याने हा फोटो शेअर केला असून याखाली एक कॅप्शनही दिलं आहे. यावर तिने लिहिलं आहे..सुर्य...वारा आणि स्वर्ग..!

First published:

Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Bollywood