मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shivpratap Garudjhep : लाल किल्ल्यांतील ऐतिहासिक थरार! अखेर 'शिवप्रताप गरूडझेप'चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर प्रदर्शित

Shivpratap Garudjhep : लाल किल्ल्यांतील ऐतिहासिक थरार! अखेर 'शिवप्रताप गरूडझेप'चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर प्रदर्शित

शिवप्रताप गरूडझेप ट्रेलर

शिवप्रताप गरूडझेप ट्रेलर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा हा सिनेमा विजयादशमीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  26 सप्टेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्र्यावर आधारित सिनेमांची नवी सिरीज अभिनेते डॉ. अमोल कोल्हे घेऊन येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा काय असायला हवा आणि कसा असतो हे तुम्हाला पाहायला मिळेल असं ठणकावून सांगणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या 'शिवप्रताप गरूडझेप' या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महाराजांची आग्र्याहून सुटका या सिनेमात पाहायला मिळणार आहे.  गेली अनेक दिवस या सिनेमाची तूफान चर्चा होती. सिनेमाचा टीझर पाहून प्रेक्षकांना ट्रेलरची उत्सुकता लागली होती आणि अखेर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा हा सिनेमा विजयादशमीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील अत्यंत मैलाचा दगड म्हणजे औरंगजेब आणि महाराजांची भेट होती. आग्र्याच्या लाल किल्ल्यातून महाराजांच्या सुटकेचा थरार शिवप्रताप गरूडझेप या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. संपूर्ण सिनेमा आग्र्याच्या त्याच ऐतिहासिक लाल किल्ल्यात शुट करण्यात आला आहे. किल्ल्यात शुट होणार शिवप्रताप गुरूडझेप हा भारतीय सिनेमांमधील पहिलाच सिनेमा ठरला आहे.

हेही वाचा - Shivpratap Garudjhep ! दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांना अमोल कोल्हेंनी आव्हान दिलेला हाच तो सिनेमा

'आग्र्यात फक्त क्रुरकर्मा औरंगजेब आपली वाट पाहत नाही तर तुटलेली बोट, लुटलेली सुरत यामुळे झालेला अपमान आपली वाट पाहत आहे.  रोखणाऱ्या नजरा आणि उगारणाऱ्या समशेरी वाट पाहत असतील,  या आऊ साहेबांच्या भारदस्त वाक्यानं ट्रेलरची सुरूवात झाली आहे.  त्यानंतर औरंगजेबाच्या भूमिकेतील यतीन कार्येकर, महाराजांच्या भूमिकेतील अमोल कोल्हे यांची एंट्री पाहायला मिळतेय. प्रत्यक्ष किल्ल्यावर शुट करण्यात आल्यानं सिनेमातील प्रत्येक दृश्य प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहेत.

" isDesktop="true" id="765728" >

सिनेमात अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वत: डॉ. अमोल कोल्हे आहेत. तर औरंगजेबाची भूमिका ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर यांनी साकारली आहे. तर जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री पल्लवी वैद्य, मनवा नाईक, कैलास वाघमारे असे अनेक कलाकार सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर आता सिनेमा पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. मात्र त्यासाठी दसऱ्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment