Home /News /entertainment /

Shivani Sonar: ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

Shivani Sonar: ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेतील या तीन अभिनेत्री मराठमोळ्या अंदाजात आपले ठुमके लावताना दिसत आहेत.

  मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी या मालिकेने सातशे भागांचा टप्पा पूर्ण केला होता. ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन या मालिकेची टीम कायमच एकत्र धमाल करत असते. या मालिकेत संजीवनी ढालेपाटील अर्थात शिवानी सोनार (Shivani Sonar) ही अभिनेत्री सध्या बरीच लोकप्रिय होताना दिसत आहे. शिवानीने मालिकेतील अभिनेत्रींसोबत धमाल करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. या मालिकेतील पात्रांची कायम चर्चा होताना दिसते. सध्या ढालेपाटलांच्या तीनही सुना मिळून एकदम कमाल नृत्य करताना दिसत आहेत. शिवानीने हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इन्स्टाग्रामवर प्रचंड फेमस होणाऱ्या एका गाण्यावर या तिन्ही अभिनेत्री थिरकताना दिसत आहेत. या गाण्याला मराठी तडका दिलेला असून अस्सल मराठमोळ्या अंदाजात या तिघी नृत्य करताना दिसत आहेत. ढोलिकचा ताल, घुंगरांची हलकी साथ असलेलं हे गाणं सध्या इन्स्टाग्रामवर तुफान लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. याआधी सायली संजीव, नितीश चव्हाण, रुपाली भोसले या कलाकारांनी सुद्धा या गाण्यावर रील बनवलं होतं आणि आता ढालेपाटलांच्या तिन्ही सुना सुद्धा या ट्रेंडचा एक भाग झाल्या आहेत. हे ही वाचा- मृण्मयीनं पुन्हा केली गौतमीची चंपी! मोठ्या भावंडांसाठी अभिनेत्रीनं आणलाय मान्सून स्पेशल भन्नाट VIDEO शिवानी इन्स्टाग्रामवर (Shivani Sonar instagram) बरीच ऍक्टिव्ह असते. ती अनेक bts व्हिडिओ म्हणा किंवा ऑफ स्क्रीन चालू असणारी धमाल सुद्धा अनेकदा शेअर करत असते. तिच्या या रिलमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री श्रुती अत्रे (Shruti Atre) आणि ऐश्वर्या शिंदे (Aishwarya Shinde) सुद्धा दिसत आहेत.
  मालिकेत संजीवनी एका गुन्हेगाराला बेदम मारताना दिसते आणि तिच्या या कृत्यामुळे रणजित ढालेपाटील तिला सक्तीच्या रजेवर पाठवतो. तिचं डोकं ठिकाणावर नाही असं कारण देऊन तिला या रजेवर पाठवलं जातं असं नव्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. प्रोमोमध्ये जरी तणाव वाढवणारं दृश्य दिसत असेल तरी ऑफ स्क्रीन मात्र मालिकेतील कलाकार एकदम ढिनच्यॅक नाच करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांची बरीच पसंती मिळाली आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Colors marathi, Tv actress

  पुढील बातम्या