Home /News /entertainment /

VIDEO : लागीरं झालं... फेम शितलीचं हे टॅलेंट तुम्ही कधीच पाहिलं नसेल

VIDEO : लागीरं झालं... फेम शितलीचं हे टॅलेंट तुम्ही कधीच पाहिलं नसेल

'लगिरं झालं जी' फेम शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिच्याकडे असं एक टॅलेंट आहे ज्याच्या बद्दल फार कमी लोकांना माहीत आहे.

  मुंबई, 02 फेब्रुवारी : बॉलीवूड कलाकार असो वा मराठी कलाकार. असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे अशी अनेक टॅलेंट आहे ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नाही. झी मराठीवर गाजलेली मालिका 'लगिरं झालं जी' फेम शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिच्याकडे सुद्धा असं एक टॅलेंट आहे ज्याच्या बद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. मात्र तिच्या कमाल टॅलेंटची एक झलक नुकतीच झी युवावर सुरू असलेल्या युवा डांसिंग क्वीनच्या मंचावर पाहायला मिळाली. तिचा हा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लागीरं झालं जी मालिकेतील शिवानीची सहकलाकार पूर्वा शिंदे म्हणजेच जयडी सध्या युवा डांसिंग क्वीन या रिअलिटी शो मध्ये परफॉर्म करत आहे. तिला भेटण्यासाठी शिवानी या मंचावर आली होती. यावेळी होस्ट अद्वैत दादरकर यानं शिवनीचं हे टॅलेंट  सर्वांसमोर आणलं. शिवानीचं टॅलेंट म्हणजे तिला टीव्ही वरील प्रसिद्ध कार्टून शिनचॅन, पिंगु, नॉडी यासारख्या सर्व पात्रांचे आवाज अगदी हुबेहूब काढता येतात.
  शिवानीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिचं हे टॅलेंट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. शिवानीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या ती झी मराठी वरील आल्टी पाल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत काम करत आहे. ‘ऑडिशनच्या वेळी त्यानं मला कपडे उतरवण्यास सांगितलं’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Shivani bavkar

  पुढील बातम्या