मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Vijayi Bhav Shiv : BBच्या घरात शिव ठाकरे पुन्हा बनला जेंटलमन! प्रियांकाबरोबर केलेल्या 'त्या' कृतीची चर्चा

Vijayi Bhav Shiv : BBच्या घरात शिव ठाकरे पुन्हा बनला जेंटलमन! प्रियांकाबरोबर केलेल्या 'त्या' कृतीची चर्चा

shiv thakare

shiv thakare

शिव ठाकरेनं घरात सगळ्यांची पंगे घेतले भांडणं केली. मात्र एखाद्याला गरज असताना तो नेहमी खंबीरपणे त्याच्यामागे उभा राहिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : बिग बॉस 16मध्ये आपला माणूस शिव ठाकरे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शिवनं पहिल्या दिवसापासून सर्वांची मनं जिंकली आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या सगळ्या लोकांबरोबर शिवनं वेळोवेळी जमवून घेतलं आहे. घरात कोणाशी मैत्री करणं असो किंवा खेळातील टास्क असो. शिवनं प्रत्येक कामगिरी उत्तमरित्या साभांळताना पाहायला मिळालं आहे. शिवचा स्त्रीयांसाठी असलेला आदरही वेळोवेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. चाहत्यांनाही तर शिव ठाकरेला आधीच बिग बॉस 16चा विजेता घोषित केला आहे. अशातच आता विजयी भव शिव ठाकरे असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. शिव खरा जेंटलमन आहे हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शिव ठाकरेनं घरात सगळ्यांची पंगे घेतले भांडणं केली. मात्र एखाद्याला गरज असताना तो नेहमी खंबीरपणे त्याच्यामागे उभा राहिला आहे. मुलींच्या बाबतीत तर त्यानं कधीच दुर्लक्ष केलं नाही. नुकतच घरात प्रियांका आणि शिव यांच्यात चांगलीच भांडणं झाली. शिव वॅलिड कारणांवर भांडत होता म्हणत अनेकांनी शिवला सपोर्ट केला. मात्र जेव्हा प्रियांकाला मदतीची गरज होती तेव्हा शिवनं तिला न कळत केलेली मदत आता सर्वांसमोर आली आहे. शिव जेंटलमन आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

हेही वाचा - Shiv Thakare: 'आतापर्यंत माझ्या 169 गर्लफ्रेंड झाल्या'; शिव ठाकरे म्हणाला, माझं आयुष्य...

घरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात प्रियांका एका रुममधून तिचं सामान घेऊन जात आहे. तिच्या हातात भरपूर सामान असून तिला पुढचं देखील व्यवस्थित दिसत नाहीये. ती रुममधून बाहेर येताना दिसतेय. ती ज्या रुममध्ये जाणार आहे त्याच रुममध्ये आधी शिव पोहोचतो. तिच्या हातातील सामान पाहून तो रुममध्ये जाताच एका हातानं दरवाजा पकडून ठेवतो.प्रियांकाला मात्र याची अजिबात कल्पना नसल्याचं पाहायला मिळतंय. ती तिच्याच तोऱ्यात सामान घेऊन रुममध्ये जातेय. तर शिव देखील त्यानं काही केलंच नाहीये असं म्हणत निघून जाते. याबद्दल तो कोणाशी काही चर्चा देखील करत नाही. मात्र शिवची ही कृती कॅमेरात कैद झाली असून प्रेक्षकांनी मन जिंकण्यात शिव पुन्हा यशस्वी ठरला आहे.

बिग बॉस 16चा ग्रँड फिनालेसाठी काहीच दिवस उरले आहेत. शिव ठाकरे. निम्रित कौर, एमसी स्टँड यांची नाव टॉप 2साठी घेतली जात आहे. हे तिघेही एकाच ग्रुपमधील आहेत. तिघांची मैत्री पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मात्र शिवसाठी मोठा फॅन वर्ग पाहायला मिळतोय.

First published:

Tags: Bigg boss, Bollywood, Bollywood News