मुंबई, 03 जानेवारी : बिग बॉस 16 चा शेवटचा आठवडा सध्या सुरू आहे. घरातील चार स्पर्धक टॉप 5मध्ये पोहोचले आहेत. शिव ठाकरे, एमसी स्टँड आणि सुंबुल मधून एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. सुंबुलच या आठवड्यात घराबाहेर जाईल असं दिसत आहे. दरम्यान शेवटच्या आठवड्यातील शेवटच्या टास्कमध्ये सगळ्यात स्पर्धकांना चांगलाच त्रास झाला आहे. टॉर्चर टास्कमध्ये अर्चना, प्रियांका आणि शालिन यांनी शिवसह त्याच्या संपूर्ण टीम फार वाईटरित्या टॉर्चर केलं. शिवच्या अंगावार मिरची मसाला, हळद ओतली. मिठ आणि हळद शिवच्या डोळ्यात फेकल्यानं शिवच्या डोळ्यात गंभीर दुखापत झाली आहे.
टास्कमध्ये अर्चनानं शिववर तिचा वैयक्तिक राग काढल्याचं पाहायला मिळालं. शिवच्या डोळ्यात हळद आणि मिठाचा मारा केला. त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात पाणी ओतलं. मिरची पावडर, हळद आणि मिठानं शिवसह निम्रित आणि एमसी स्टँड यांना प्रचंड त्रास झाला. निम्रित आणि एमसी स्टँडनं खेळत असता आरडाओरडा तरी केला पण शिव मात्र संपूर्ण टास्कमध्ये एक शब्दही बोलला नाही. या सगळ्यात त्याच्या डोळ्याला प्रचंड दुखापत झाली आहे. खेळ संपल्यानंतर त्याचा उजवा डोळा उघडणं देखील त्याला कठीण झालं होतं. एका डोळ्यावर हात ठेवून तो घरभर फिरत होता. प्रचंड वेदना सहन करताना शिव दिसला.
Promo:
Karan Johar bashes #ArchanaGautam #BB16 #BiggBoss #BiggBoss16 pic.twitter.com/WcA94TEdlS — 👀 (@daffodil_im) February 2, 2023
घरात जितका त्रास शिवला झाला तितकाच त्रास एमसी स्टँड आणि निम्रितला ही झाला. पण याचं अर्चना आणि इतर लोकांना काही वाटलं नाही. शिवला सर्वाधिक वेदना होत असताना त्याची चौकशीही करण्यात आली. यावरून निम्रित आणि एमसी स्टँडनं अर्चनाची चांगलीच शाळा घेतली.
शिव, निम्रित आणि स्टँड बसलेले असताना, 'मला अर्चनाचा खूप राग येतोय', असं स्टँड म्हणतो. 'मला तर तिला मारावसं वाटत आहे', असं निम्रित म्हणते. तितक्यात तिथे अर्चना येते आणि शिवची विचारपूस करते. तितक्यात निम्रित तिला 'तू इथून निघून मला तुझा खूप राग आला आहे', असं म्हणते. त्यावर अर्चना तिला, 'तुझ्या चेहऱ्याला जे झालं आहे तेच माझ्या आणि प्रियांकाच्या चेहऱ्यालाही झालं आहे', असं सांगते. तिथेच निम्रित आणि अर्चनाचं भांडण होतं. तसंच विकेंड वारला देखील करण जौहर अर्चनाला चांगलंच सुनावताना दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bollywood, Bollywood News, Marathi news