Home /News /entertainment /

Shiv Thakare update: बिगबॉस फेम शिव ठाकरेला बर्फात सुद्धा workout ची हौस, पाहा Video

Shiv Thakare update: बिगबॉस फेम शिव ठाकरेला बर्फात सुद्धा workout ची हौस, पाहा Video

बिगबॉस या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अमरावतीचा पोरगा (Shiv Thakare) शिव ठाकरे कायमच चाहत्यांच्या आवडीचा राहिला आहे. शिवने नुकत्याच केलेल्या एका कारामतीची बरीच चर्चा होत आहे.

  मुंबई 10 जून: बिगबॉस मधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) सगळ्यांच्या परिचयाचा आहे. शिवचा वेगळाच वॉरियर अंदाज त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. शिव त्याच्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो. तो सध्या सुट्टीवर गेला असून तिथे जाऊन त्याने केलेल्या कारामतींची बरीच चर्चा होत आहे.  शिव सध्या कामाच्या टेन्शनमधून बाहेर येत छान सुट्टीवर गेला आहे. (Shiv Thakare vacation) त्याच्या या काश्मीर vacation चे फोटो तो गेले अनेक दिवस सोशल मीडियावर शेअर करत आहे. यात अनेक फोटोमधून त्याने काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन जागांचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत. पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या चादरीत त्याने परिधान केलेल्या भन्नाट आऊटफिटमध्ये तो एखाद्या हिरोपेक्षा कमी दिसत नाहीये. त्याने काश्मीरमध्ये जाऊन सुद्धा असा काही प्रकार केला की अनेकांनी डोक्याला हात लावला. बर्फाने भरलेल्या सुंदर काश्मीरच्या परिसरात सुद्धा शिवला workout करायचा मोह टाळता येत नाहीये. 14000 ft उंचीवर जाऊन सुद्धा व्यायाम करायची हौस त्याला सोडवत नाही हे त्याने शेअर केलेल्या रिलमधून स्पष्ट होत आहे. या खास रीलला कॅप्शन देत तो  हणतो, “आम्ही फिटनेस फ्रीक लोक आहोत, आम्ही स्थळ, वेळ काहीही न बघता कुठेही व्यायाम करू लागतो.” ज्या बर्फामध्ये लोक एकावर एक जॅकेट घालून थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करतात त्याच बर्फात पुशअप्स मारायची ही हौस त्याने पूर्ण केली आहे. त्याच्या या धाडसाला दाद दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. त्याच्या फिटनेसबद्दल असलेली जागरूकता बघून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी हसतहसत डोक्याला हात लावला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

  त्याच्या या व्हिडिओमुळे काश्मीरच्या तापमानात फरक पडला का असा भन्नाट सवाल केला जात आहे. एका युजरने त्याला खास कमेंट करून सांगितलं आहे, “ क्या बात! एवढ्या थंडीत सुद्धा तुझ्या व्यायामाने वातावरण गरम झालं असणार! ठंडी में भी गर्मी!”  हे ही वाचा- VIDEO: ना मोठं स्टेज, ना मोठा शो; अंबाबाईच्या मंदिरात खाली बसून अवधूत गुप्तेनं गायलं गाणं शिवने त्याच्या शिकारा बोट मधल्या सफरीचे खास क्षणसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. काश्मीरची हाऊसबोट खूपच प्रेक्षणीय असते. या बोटीत बसून सुंदर नजारा बघायची संधी त्याने सोडली नाहीये. हाऊसबोटीत फिरताना त्याने खास इन्स्टाग्राम स्टोरी, पोस्टच्या माध्यमातून असलेली धमाल त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे. काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये हरवून गेलेला अमरावतीचा शिव सगळ्यांचा खूप लाडका आहे. 
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या