Home /News /entertainment /

Shiv Thakare: 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेला चढला 90s चा फिव्हर, 'या' फेमस गाण्यावर केला डान्स

Shiv Thakare: 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेला चढला 90s चा फिव्हर, 'या' फेमस गाण्यावर केला डान्स

बिगबॉस या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अमरावतीचा पोरगा शिव ठाकरे कायमच चाहत्यांच्या आवडीचा राहिला आहे. शिवने नुकत्याच केलेल्या एका डान्सची बरीच चर्चा होत आहे.

  मुंबई 25 जून: बिगबॉस (Big Boss Marathi) मधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) सगळ्यांच्या परिचयाचा आहे. शिव त्याच्या कमाल आणि अनोख्या अंदाजासाठी ओळखला जातो. शिव त्याच्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो. तो सध्याएका नव्या गाण्यावर थिरकलेला पाहायला मिळाला. त्याने केलेल्या या डान्स विडिओची बरीच चर्चा होत आहे. बिग बॉस मराठी कार्यक्रमातून फेमस झालेला शिव ठाकरे सध्या वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. (Shiv Thakare dance reels)असाच नृत्यातला प्रयोग त्याने करून पाहिल्याचं समोर येत आहे. शिव (Shiv Thakare Instagram) सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह असतो. त्याचे फिटनेस विडिओ, डान्स विडिओ वेगवेगळे अपडेट्स तो चाहत्यांसोबत कायमच शेअर करत असतो. सध्या त्याच्या डान्स व्हिडिओमुळे तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आणि हा साधा सुधा डान्स विडिओ नसून त्याला 90s चा तडका लावताना शिव दिसत आहे. ‘में खिलाडी तू अनाडी’, या लोकप्रिय गाण्यावर शिव ठिकताना दिसत आहे. त्याच्या नृत्यकौशल्याबद्दल तर सगळ्यांना कल्पना आहेच आता त्याच्या डान्स मूव्हस बघून चाहते भारावून गेले आहेत. शिवच्या या भन्नाट डान्स व्हिडिओचं कौतुक होताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

  शिव कायमच बऱ्याच वेगवेगळ्या भन्नाट गोष्टी करताना दिसत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा तो अनाडी नव्हे तर खिलाडीच आहे हे जाणवत. शिव कधी बर्फाने भरलेल्या सुंदर काश्मीरच्या परिसरात workout करताना दिसतो तर कधी डान्स मूव्हसने चाहत्यांना घायाळ करताना पाहायला मिळतो. कधी काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये हरवून जाणारा कधी असे कमाल डान्स विडिओ शेअर करणारा हा अमरावतीचा शिव सगळ्यांचा खूप लाडका आहे. हे ही वाचा- स्टेजवरच सारा अली खाननं सलमानला म्हटलं 'अंकल', पाहा भाईजानच्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO
   शिव बिग बॉस व्यतिरिक्त कोणत्याच मोठ्या प्रोजेक्टमधून आत्ता तरी दिसून आला नाही. शिव सगळ्या इव्हेंट्स मध्ये आपल्याला कमाल नृत्य करताना दिसतो. तो त्याच्या फिटनेस बाबत सुद्धा बराच जागरूक आहे. पिळदार शरीरयष्टी, गोड हसू असं सगळं त्याच्याकडे आहे पण अजून तो कोणत्याच मोठ्या फिल्मचा भाग झालेला नाही. त्याला मोठ्या पडद्यावर पाहायला चाहते उत्सुक आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  पुढील बातम्या