'ठाकरे' चित्रपटाचा येणार सिक्वल, बाळासाहेबांचं वादळ पुन्हा झळकणार पडद्यावर

बाळासाहेबांच्या आयुष्याचा पटच समाजकारण आणि राजकारणातल्या वादळी पर्वाने भरलेला असल्याने बाळासाहेबांचं आयुष्य फक्त एका चित्रपटात मावणारं नाही असं निर्मात्यांना वाटतं

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 05:39 PM IST

'ठाकरे'  चित्रपटाचा येणार सिक्वल, बाळासाहेबांचं वादळ पुन्हा झळकणार पडद्यावर

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या आयुष्याचा वेध घेणारा 'ठाकरे' हा चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत राहिला आणि वादळीही ठरला.

या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका कोण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांच्या भूमिकेत उत्तम काम केल्याची पावती त्याला मिळालीय.

'ठाकरे' हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच आल्याने राजकारण डोळ्यासमोर ठेऊन हा चित्रपट आल्याची टीकाही झाली होती. मात्र सर्वांनीच ही टीका फेटाळून लावली.

या चित्रपटाची चर्चा झाली असली तरी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट गल्ला जमवण्यास थोडा कमी पडला.

'ठाकरे'साठी 40 कोटींचा खर्च झाला मात्र बॉक्स ऑफिसवर त्याने फक्त 31 कोटी 60 लाखांची कमाई केली.

Loading...

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा कमाई करू शकला नसला तरी त्याचे निर्माते आता पुन्हा एकदा 'ठाकरे'चा सिक्वल तयार करण्याची योजना आखताहेत.

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा कमाई करू शकला नसला तरी त्याचे निर्माते आता पुन्हा एकदा 'ठाकरे'चा सिक्वल तयार करण्याची योजना आखताहेत.

बाळासाहेबांच्या आयुष्याचा पटच समाजकारण आणि राजकारणातल्या वादळी पर्वाने भरलेला असल्याने बाळासाहेबांचं आयुष्य फक्त एका चित्रपटात मावणारं नाही असं निर्मात्यांना वाटतं

बाळासाहेबांच्या आयुष्याचा पटच समाजकारण आणि राजकारणातल्या वादळी पर्वाने भरलेला असल्याने बाळासाहेबांचं आयुष्य फक्त एका चित्रपटात मावणारं नाही असं निर्मात्यांना वाटतं

या चित्रपटात पुन्हा नवाजुद्दीन सिद्दीकीच  राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगचं काम सुरू असल्याची माहिती नवाजुद्दीन सिद्दीकीने न्यूज18 इंडियाशी बोलताना दिली.

निर्मात्यांनी पुन्हा या चित्रपटासाठी करार केला तर त्याचा आनंदच वाटेल असं नवाजुद्दीन सिद्दीकीने म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट आपल्या कारकिर्दीतला सर्वात चांगला चित्रपट असल्याची प्रतिक्रियाही त्याने दिलीय.

Sena (MNS) party workers pour milk on a portrait of Shiv Sena founder Balasaheb Thackeray during the release of the film 'Thackeray' at Vandana Cinema, in Thane, Friday, Jan. 25, 2019. (PTI Photo)(PTI1_25_2019_000162B)

या सिक्वलवर काम सुरू झालं असून 2020 पर्यंत हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

 या चित्रपटाचं शुटींग केव्हा होणार आणि रिलीज करण्याची तारिख यावर मात्र फार बोलण्याचं त्याने टाळलंय.

या चित्रपटात बाळासाहेबांच्या कारकिर्दीतल्या अशा अनेक घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार असून त्याची फारशी चर्चा झालेली नाही.

बाळासाहेब हे सगळ्यांचा आकर्षणाचा विषय असल्यामुळे या चित्रपटाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...