मुंबई, 15 जून : अनेक मालिका अव्याहत सुरू असतात. प्रेक्षकांनाच वाटत असतं की त्या कधी संपणार. सध्या लागीरं झालं जी मालिकेत फार काही दम राहिलेला नाही. त्यामुळे ती आता निरोप घेतेय.
सुरुवातीला मालिकेतले शीतल आणि अजिंक्य खूप लोकप्रिय झाले होते. कोल्हापूरी बाजाची भाषा प्रेक्षकांना आवडायची. पण आता मालिकेतली कथाच संपल्यासारखी वाटतेय. शीतल गरोदर आहे आणि तिच्या डोहाळे जेवणाच्या दिवशीच अजिंक्य बेपत्ता असल्याचा आर्मीकडून फोन येतो.
‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादाच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
‘या’ अभिनेत्यालाच लग्नाची मागणी घालत अश्लील मेसेज पाठवतात मुलं
अजिंक्य गावी सुद्धा नाहीये आणि बॉर्डरवर पण नाहीये. त्याची शोधाशोध सुरू होते. पण तो
सापडत नाही. दरम्यान शीतलला मुलगा होतो. सगळ्यांना वाटतंय की अजिंक्य या जगात नाही. शीतल हे स्वीकारायला तयार नाही. घरच्यांना तोंड देत ती थकून गेलीय. पण अजिंक्य जिवंत असतो. तो असतो पाकिस्तानात कैदी.
मुंबईतील अंडरवर्ल्डवर आधारित ‘मुंबई सागा’मध्ये दिसणार ‘हे’ स्टार कलाकार
शीतल ठरवते की अजिंक्य जोवर सापडत नाही तोवर त्याचं स्वप्न अर्ध्यात सुटून नाही चालणार. ती स्वत: आर्मीत
जाण्याचा निर्णय घेते. लहान मूल सांभाळत शीतल भरती होते आणि ट्रेनिंग पूर्ण करते. शीतल जॉइन झाल्यानंतर
एक दिवस अचानक आर्मीकडून फोन येतो की अजिंक्यचा सुगावा लागलाय. त्याला भारत सरकार परत आणण्यासाठी
प्रयत्न करणार आहे आणि लवकरच अजिंक्य पुन्हा भारतात येईल.
अजिंक्य परत येतो. शीतल वर्दीमध्येच त्याचं स्वागत करते. तिला वर्दीत पाहून त्याला खूप आनंद होतो. गावात
दोघांचं जंगी स्वागत होतं.
22 जून रोजी ही मालिका संपणार आहे. त्या जागी मिसेस मुख्यमंत्री सुरू होईल.
VIDEO: अबब! घरात शिरला भलामोठा अजगर, अन्...