‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अमरनाथ यात्रेला जाताना वडीलांचा मृत्यू

सध्या शाइनी 'श्रीमद् भागवत' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2019 12:04 PM IST

‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अमरनाथ यात्रेला जाताना वडीलांचा मृत्यू

मुंबई, 14 जुलै : प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘जमाई राजा’ फेम अभिनेत्री शाइनी दोशी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून  मीडिया रिपोर्टनुसार अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं शाइनीच्या वडीलांचा मृत्यू झाला आहे. शाइनीचे वडील अमरनाथ यात्रेला निघाले होते. बराच प्रवास केल्यानंतर त्यांची तब्बेत अचानक बिघडू लागली. सुरूवातीला त्यांच्या छातीत दुखत होतं पण नंतर कोणाला काही समजायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला होता. वडीलांच्या मृत्यूनं शाइनी आणि तिचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.

एका एंटरटेन्मेंट पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार अमरनाथ यात्रेच्या दरम्यान तब्बेत अचानक बिघडू लागल्यानं शाइनीच्या वडीलांना मिलिटरी ऑफिसरांनी टूरिस्ट मेडिकल सेंटरमध्ये भरती केलं. त्याठिकणी पोहोचल्यावर तिच्या वडीलांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समजलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दवाखान्यात नेत असतानाच त्यांचं निधन झालं होतं.

...म्हणून प्रेक्षकांची लाडकी सूनबाई पुन्हा येतेय छोट्या पडद्यावर

Loading...

 

View this post on Instagram

 

Snow angel‍♀️

A post shared by shiny doshi (@shinydoshi15) on

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार शाइनीच्या वडीलांचं पार्थिव आज गुजरातच्या त्यांच्या घरी आणलं जाणार आहे. शाइनीला ही बातमी समजताच ती लगेचच गुजरातला रवाना झाली. तिच्या या दुःखाच्या काळात तिचं सांत्वन करण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीतील तिचा मित्रपरिवार गुजरातला पोहाचला आहे.

सलमान सुद्धा घेणार ‘नच बलिये 9’मध्ये भाग, कोण असेल त्याची जोडीदार

 

View this post on Instagram

 

The man who taught me everything in life. #gratitude The place whr i began my journey

A post shared by shiny doshi (@shinydoshi15) on

शाइनी दोशीनं 2013मध्ये संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'सरस्वतीचंद्र' या मालिकेतून टीव्ही डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं 2016 मध्ये ‘जमाई राजा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे शाइनी नवी ओळख मिळाली. सध्या शाइनी 'श्रीमद् भागवत' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती  'सरोजिनी', 'बहू हमारी रजनीकांत', 'लाल इश्क' आणि 'दिल ही तो है' या मालिकांमध्ये दिसली होती. तसेच 2017 मध्ये तिनं खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्यानंतर झायरा वसीमची सोशल मीडियावर भावुक पोस्ट, म्हणाली..

===================================================================

VIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 12:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...