अशी आहे विक्रांत सरंजामेची राजनंदिनी!

मराठी मालिकांपेक्षा शिल्पानं जास्त हिंदी मालिका केल्या.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 05:39 PM IST

अशी आहे विक्रांत सरंजामेची राजनंदिनी!

लवकरच प्रेक्षकांना तुला पाहते रे मालिकेत राजनंदिनीची एंट्री पाहायला मिळणार आहे. शिल्पा तुळसकर राजनंदिनीची भूमिका साकारणार आहे. शिल्पासोबत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे.

छोट्या पडद्यावरून शिल्पाची एंट्री घराघरात झाली. तिची सुरुवात दूरदर्शनवरच्या मालिका ब्योमकेश बक्षी आणि शांतीमधून झाली. दोन्ही मालिका खूप लोकप्रिय होत्या.

मराठी मालिकांपेक्षा शिल्पानं जास्त हिंदी मालिका केल्या. लेडीज स्पेशल, जाना ना दिल से दूर, कैसा ये प्यार है, क्यूँ होता है प्यार, टिचर या काही तिच्या गाजलेल्या मालिका.

Loading...

कलर्सवरच्या वीर शिवाजी मालिकेत तिनं जिजामाता साकारली होती. देवों का देव महादेवमध्ये राणी मेणावतीची भूमिका तिनं केली होती.

देवकी, आनंदाचे झाड, डोंबिवली फास्ट या सिनेमातल्या तिच्या भूमिका लक्षात राहिल्या.

‘तुला पाहते रे’ मालितेच्या शीर्षकगीतात शिल्पाची झलक पाहायला मिळते. पण आता राजनंदिनीचं रहस्य काय आहे, तिच्यासोबत काय घडलंय, बंद खोलीचं काय रहस्य आहे हे सर्व उलगडणार आहे.

तिच्या एंट्रीबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, "आतापर्यंत प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप प्रेम केलं. आता मी लवकरच राजनंदिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना मालिकेत दिसेन, त्यामुळे विक्रांतचे सत्य, विक्रांत आणि राजनंदिनीची केमिस्ट्री आणि पुढील कथेचा उलगडा होणार आहे.''

तिच्या एंट्रीबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, "आतापर्यंत प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप प्रेम केलं. आता मी लवकरच राजनंदिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना मालिकेत दिसेन, त्यामुळे विक्रांतचे सत्य, विक्रांत आणि राजनंदिनीची केमिस्ट्री आणि पुढील कथेचा उलगडा होणार आहे.''बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2019 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...