मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कोरोना लस घेणारी ही ठरली पहिली बॉलिवूड अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केला अनुभव

कोरोना लस घेणारी ही ठरली पहिली बॉलिवूड अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केला अनुभव

बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actress) शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) यांनी नुकतीच कोरोना लस (Corona vaccine) टोचून घेतली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर करत आपला अनुभव (Experience) सांगितला आहे.

मुंबई, 08 जानेवारी: सध्या हळूहळू विविध देशांत कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही एक आनंदाची बातमी आहे. लसीकरणाच्या बाबतीत आता भारतातही (India) तातडीची पावलं उचलली जात आहेत. दरम्यान कोरोना लस नुकत्याच एका अभिनेत्रीनं (Actress) घेतली आहे.  गोपी किशन, आंखे, बेवफा सनम, खुदा गवाह यांसारख्या हिट चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चमक दाखवणाऱ्या शिल्पा शिरोडकर (Shilpa shorodkar)या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत, ज्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. यावेळी त्यांनी कोरोना लसीकरणानंतर आपला अनुभव (Experience) शेअर केला आहे.

शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. लस टोचल्यानंतर कसं वाटतंय हे त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे. यो फोटोमध्ये शिल्पाच्या चेहर्‍यावर मास्क परिधान केलेला आहे आणि तिच्या हातावर एक छोटी पट्टी बांधलेली आहे. हा फोटो शेअर करताना लिहिलं की- 'लस घेतली आणि सुरक्षित आहे... हे न्यु नॉर्मल आहे... 2021 मध्ये मी आले आहे'.

(हे वाचा-'डाव मांडते भीती... ' अमृता फडणवीस यांचं नवं गाणं; पाहा VIDEO)

शिल्पा यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिल्पाशिवाय इतर कोणत्याही भारतीय अभिनेत्रीनं कोरोना लस टोचून घेतलेली नाही. शिल्पा यांना दुबईत ही लस देण्यात आली आहे. लग्नानंतर शिल्पा शिरोडकर काही काळ भारतात राहिल्या. त्यानंतर त्या दुबईला राहायला गेल्या. शिल्पानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचं 2000 साली लग्न झालं होतं. तिचा नवरा आणि ती पाच वर्षे लाँग डिस्टन्समध्ये राहिले. त्यानंतर ती दुबईला राहायला गेली होती. तिथे ती आपल्या कुटुंबियासोबत राहते.

(हे वाचा-माहीत आहे का? हे सिनेस्टार्स देत आहेत गंभीर आजारांशी लढा, तरीही देतात हिट सिनेमे)

शिल्पा शिरोडकर लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. चित्रपटांमधील कमबॅकविषयी शिल्पानं सांगितलं की, माझ्या काळापासून सिनेमात बराच बदल झाला आहे. आता लोक अधिक प्रोफेशनल झाले आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, मी माझ्या करियरच्या त्या टप्प्यावर आहे, तिथे मी रोमँटिक चित्रपटातील मुख्य पात्र साकारण्याचा विचारही करू शकत नाही.

First published:

Tags: Bollywood actress, Corona vaccine, Instagram