‘पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणार, कोण अडवतो बघू’, मराठी अभिनेत्रीचं ओपन चॅलेंज

‘पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणार, कोण अडवतो बघू’, मराठी अभिनेत्रीचं ओपन चॅलेंज

‘पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणार, कोण अडवतो बघू’ असं ओपन चॅलेंज देणाऱ्या या अभिनेत्रीनं लोकसभा निवडणूकांच्या वेळी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : सध्या भारत आणि पाकिस्तानमधी संबंध अतिशय तणावपूर्ण झालेले असल्यानं बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्यात आली आहे. अशात काही दिवसांपूर्वी भारतीय गायक मिका सिंह पाकिस्तानमध्ये परफोर्म करून भारतात परतला. त्यानंतर त्यावर अक्षरशः टीकेची झोड उठली. ऑल इंडिया सिने वर्कर एसोसिएशन (AICWA) आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉई (FWICE) यांनीही त्यावर बंदी घातली होती. मात्र यावर मिका सिंहनं माफी मागितल्यावर त्यावरील ही बंदी हटवण्यात आली. हे प्रकरण इथे संपत असतानाच अभिनेत्री आणि बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदेनं यावर संताप व्यक्त केला आहे. तिनं यावर अशी काही प्रतिक्रिया दिली की सोशल मीडियावर सर्वत्र खळबळ माजली आहे.

लोकप्रिय टीव्ही शो 'भाबी जी घर पर हैं' मध्ये 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेनं मिका सिंहला सपोर्ट केला आहे. स्पॉट बॉयईनं प्रसिद्ध केलेल्या वृतानुसार शिल्पा सांगते, ‘जर माझा देश मला व्हिसा देत असेल आणि त्यांचा देश माझं स्वागत करत असेल तर मी पाकिस्तानात नक्कीच जाईन. एक कलाकार म्हणून त्या ठिकाणी परफॉर्म करेन आणि हा माझा हक्क आहे त्यासाठी मला कोणीही थांबवू शकणार नाही. तुम्ही कोणत्याही कलाकाराला अशाप्रकारे बंदी नाही घालू शकत. मला माझ्या हक्काची भाकरी कमावण्यासाठी कोणत्याही माध्यमांची गरज नाही. मला वाटलं तर मी रस्त्यावरही स्टेज आणून त्यावर परफॉर्म करु शकते. मीका सिंहला जबरदस्तीनं माफी मागायला लावली आहे. हे खूप चुकीचं आहे.’

शिल्पा पुढे म्हणाली, ‘मी एक कलाकार आहे. त्यामुळे मला ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी मी परफॉर्म करणार. कोणाचीही एवढी हिंमत नाही की , मला रोखून दाखवेल. या लोकांची मला अजिबात भीती वाटत नाही. मीका सिंहवर बंदी घालणाऱ्या फेडरेशन सारख्या 50 फेडरेशन आहेत. सर्वांना फक्त पैसे हवे आहेत.’ यावेळी बोलताना शिल्पानं तिच्या पाकिस्तानी चाहत्यांबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, ‘माझे असे कितीतरी पाकिस्तानी चाहते आहेत, ज्यांनी मला बिग बॉस जिंकण्यासाठी मदत केली आहे. मला त्या ठिकाणहून कुरिअरने कपडे पाठवले जातात आणि मी सुद्धा त्यांना पाठवते, यात चुकीचं काय आहे.’

शिल्पा शिंदे ‘बिग बॉस 11’ विनर आहे. तिनं काही टीव्ही मालिकांसोबतच काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'भाबी जी घर पर हैं' सोडल्यानंतर ती खूपच चर्चेत होती. मालिकेचे मेकर्स खूप काम करून घेत असून त्याप्रमाणे मानधन मात्र देत नसल्याचा आरोप शिल्पानं केला होता. हे प्रकरण खूपच वादात राहीलं. त्यानंतर तिला बिग बॉसची ऑफर मिळाली.

==============================================================

VIDEO: गोविंदा आला रे आला! 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading