• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'देसी गर्ल'वर शिल्पाचा नागीन डान्स; मंचावर वेधलं साऱ्याचंच लक्ष, VIDEO Viral

'देसी गर्ल'वर शिल्पाचा नागीन डान्स; मंचावर वेधलं साऱ्याचंच लक्ष, VIDEO Viral

'सुपर डान्सर चॅप्टर 4’ (Super Dancers Chapter 4) मध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान (Farah Khan) देखील उपस्थित होती.

 • Share this:
  मुंबई  6 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर 4’ (Super Dancers Chapter 4) मध्ये रविवारच्या एपिसोड मध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान (Farah Khan) देखील उपस्थित होती. फराह ही प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक देखील आहे. यावेळी फराह सोबत जज गीता मां (Geeta Ma) आणि शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) धमाल डान्स केला. तेव्हा सगळे स्पर्धक देखील मंचावर उपस्थित होते. ‘देसी गर्ल’ (Desi Girl) या सुपर हीट गाण्यावर सगळेजण थिरकताना दिसले. यावेळी शिल्पाने भन्नाट परफॉर्मन्स केला. देसी गर्लवर तिने चक्क नागीण डान्स (Nagin Dance) केला. इतकचं नाही तर नागीण प्रमाणे जीभ बाहेर काढून तिने नृत्य केलं. तेव्हा सारेच जन शिल्पाकडे पाहू लागले. सोनी टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडिओत सगळेजण नृत्य करताना दिसत आहेत.
  दरम्यान शिल्पा आता आपलं काम पूर्वपदावर येऊन करत असल्याचं दिसत आहे. जुलै महिन्यात पती राज कुंद्राला (Raj Kundra) अटक झाल्यानंतर जवळपास 1 महिना ती आपल्या कामावर हजर नव्हती. मात्र त्यानंतर तिने सुपर डान्सरच्या मंचावर हजेरी लावली. मात्र राज कुंद्रा अद्यापही जेल मध्येच आहे. अश्लील चित्रफिती (Pornography) प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.

  ..आणि शाहरुखने गौरीला बुरखा घालण्यास सांगितला; पाहा काय घडलं होतं

  शिल्पालाही यानंतर मोठ्या संकटाना सामोर जावं लागलं होतं. सोशल मीडियातून तिच्यावरही टीका झाली होती. मात्र शिल्पाने या प्रकरणावर मौन बाळगल आहे. व या प्रकरणात आपण काहीही बोलणार नसल्याचं तिने आधीच स्पष्ट केलं आहे.
  Published by:News Digital
  First published: