मुंबई 10 सप्टेंबर : अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आईचं नुकतच निधन झालं आहे. त्यामुळे अक्षयवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अरुणा भाटिया (Aruna Bhatia death) यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती. मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते. तर दुसऱ्या दिवशीही अनेक सेलिब्रिटींनी अक्षयच्या घरी हजेरी लावली होती. अक्षयची जुनी मैत्रीण अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) रात्री अक्षयच्या घरी गेली होती.
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh), सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, मलायका अरोरा, अर्जून कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, चंकी पांडे तर आता शिल्पाने ही जवळचा मित्र अक्षयच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्याच्या घरी हजेरी लावली होती.
View this post on Instagram
दरम्यान एक वेळ अशी होती जेव्हा अक्षय आणि शिल्पा एकमेकांना डेट करत होते. तर त्या नंतरही ते चांगले मित्र मैत्रीण होते. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत एकत्र काम केलं होतं. धड़कन, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, जानवर, इंसाफ अशा हीट चित्रपटांत ते दिसले होते.
View this post on Instagram
अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील सध्या मोठ्या संकटातून जात आहे. तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पण अशा वेळीही तिने अक्षयच्या दुःखात सहभागी होत त्याला भेट दिली. याशिवाय नुकतंच शिल्पाच्या घरी गणपती बाप्पाच आगमन झालं आहे. यावेळी राज कुंद्रा नसताना तिने एकटीनेच बाप्पाला घरी आणलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Entertainment, Shilpa shetty